Chandrayaan 3 : चांद्रयान मोहीमेकडे देशवासियांचं लक्ष! ज्योतिषशास्त्र तज्ज्ञांनी सांगितली सविस्तर कुंडली, ग्रहदशा
Chandrayaan 3 Astrology : प्रत्येक भारतीयांसाठी अतिशय खास असा दिवस आहे. अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक कामगिरी करणार आहे. अशात आजचा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून कसा आहे जाणून घेऊयात या मोहीमची कुंडली...
Chandrayaan 3 Astrology : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्रांना अतिशय महत्त्व आहे. ग्रह आणि नक्षत्राच्या स्थितीवर माणसाच्या आयुष्यातील घडामोडीबद्दल भाकित केलं जातं. शनिनंतर कुठला महत्त्वाचा ग्रह असेल तर तो चंद्र...भारत आज चंद्रावर पाऊल ठेवणार आहे. (chandrayaan 3 isro moon mission vikram lander landing What Astrologers Say in marathi)
आज चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर संध्याकाळी 6.04 वाजता सॉफ्ट लँडिंग होणार आहे. चांद्रयान-3 हे 14 जुलैला चंद्राकडे झेपावलं होतं. आजचा दिवस हा इस्त्रोच्या वैज्ञानिकांपासून प्रत्येक भारतीयांसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे चांद्रयान-3 लँडिंग यशस्वी व्हावं म्हणून प्रत्येक भारतीय आपल्यापरी देवाकडे साकडं घालत आहे. अनेक ठिकाणी मंदिरात होमहवन केले जातं आहे. अशात ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याशी आम्ही संवाद साधला. त्यांनी चांद्रयान-3 चा लँडिंग बद्दल आजचा दिवसांचं ज्योतिषशास्त्रादृष्टीकोनातून विलेश्षण केलं आहे.
काय म्हणतात ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ ?
आनंद पिंपळकर यांनी सांगितलं की, पंचांगानुसार आज चंद्र हा तूळ राशीत आहे. चंद्र हा वृषभ राशीचा स्वामी आहे. शिवाय पंचांगानुसार आज श्रावण मासातील सप्तमी तिथी आणि शुभ असा ब्रह्म योगही आहे. चंद्रयान 3 ची कुंडली पाहिली तर त्याची लग्न रास ही वृश्चिक तर लग्न स्वामी हा मंगळ आहे. मंगळ हा कुंडलीतील दहाव्या घरात शुक्रासोबत विराजमान आहे. कुंडलीतील ही स्थिती या मोहीमेसाठी अतिशय सकारात्मक आहे. शिवाय लग्नेशचं दशम स्थान मजबूत स्थिती असल्याने ही मोहीम यशस्वी होणार असल्याचं भाकीत पिंपळकरांनी केलं आहे.
त्याशिवाय चांद्रयान-3 च्या लँचिंगची वेळही अतिशय चांगली होती. त्यावेळी भाग्यस्थानाचा स्वामी चंद्र सातव्या घरात होता. अशात चंद्राचं उच्च स्थान हे या मोहीमेच्या यशस्वी होण्यासाठीचं योग समिकरण जुळून आल्याचं ज्योतिषशास्त्र तज्ज्ञानी सांगितलं आहे.
27 ऑगस्ट ही तारीखही आहे खास
इस्त्रोकडून असंही सांगण्यात आलं आहे की, जर ऐनवेळी काही अघटित घडलं तर चांद्रयान 3 चं लँडिंग हे 27 ऑगस्ट तारखेला होऊ शकतं. पंचांगानुसार त्या दिवशी श्रावण शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे. शिवाय त्या दिवशी प्रीति आणि आयुष्मान असा शुभ योग जुळून आला आहे. तर चंद्र हा धनु राशीत असणार आहे. तोही दिवस या मोहीमसाठी चांगला असून तो यशस्वी होणार असं भाकीत ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांनी केलं आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)