Chaturgrahi Yog in Leo Sign: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो. यावेळी नुकतंच सूर्याने गोचर केलं आहे. सूर्यदेवाने 17 ऑगस्ट रोजी स्वराशी सिंह राशीत प्रवेश केलाय. सूर्याच्या या गोचरमुळे सिंह राशीमध्ये दुर्मिळ चतुर्ग्रही योग तयार होत आहे. एकाच राशीत चार ग्रह एकत्र आल्यानंतर चतुर्ग्रही योग तयार होतो. यावेळी सिंह राशीमध्ये सूर्य, मंगळ, बुध आणि चंद्र हे ग्रह एकत्र आल्याने हा खास योग तयार झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैदिक ज्योतिष्य शास्त्रामध्ये, सिंह राशीत असलेले हे सर्व ग्रह सूर्याचे मित्र मानले जातात. सूर्य स्वतःच्या राशीत खूप बलवान आहे. बुध आणि सूर्य बुधादित्य योग तयार होतोय. तर चंद्र आणि मंगळ देखील सिंह राशीत शुभ परिणाम देतात. अशा स्थितीत या चतुग्रही योगाचा सकारात्मक परिणाम काही राशींच्या व्यक्तींवर होणार आहे. चला जाणून घेऊया कोणत्या राशींना व्यक्तींना या योगाचे चांगले परिणाम दिसून येणार आहेत.


मेष रास


या राशीमध्ये पाचव्या घरात चतुर्ग्रही योग तयार होणार आहे. याशिवाय याठिकाणी बुध आणि चंद्र सारख्या शुभ ग्रहांची उपस्थिती खूप चांगले परिणाम देणार आहे. या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात प्रचंड नफा होण्याची शक्यता आहे. तुम्हाला काही महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. गुंतवणूक, बँकिंग, शेअर मार्केट यामधून तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळू शकतात. स्पर्धा परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांना यश मिळणार आहे. अविवाहित लोकांचे विवाह निश्चित केले जाऊ शकतात.


सिंह रास


या राशीमध्ये पहिल्या घरात चतुर्ग्रही योग तयार होणार आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास शिखरावर असणार आहे. तुमची ऊर्जा सर्व अडथळ्यांवर मात करण्यास सक्षम असणार आहे. धन आणि लाभाचे प्रमाण चांगले राहील. या काळात तुम्ही उत्तम नेतृत्व कराल आणि तुमच्या कामात यश मिळवू शकणार आहात. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतं. नोकरदार लोकांनाही लाभ मिळू शकतो. कोर्ट-कचेरीचे प्रश्न सुटणार आहेत. 


वृश्चिक रास


या राशीच्या तुमच्या दहाव्या घरात चतुर्ग्रही योग तयार होत आहे. यावेळी सूर्य आणि मंगळाची स्थिती तुम्हाला कामाच्या ठिकाणी उत्तम यश देणार आहे. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणत्या ठिकाणी पैसे अडकलेले असतील तर ते मिळू शकणार आहे. बुधामुळे तुमचा संवाद खूप चांगला होणार आहे. जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही या काळात करू शकता. आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. व्यावसायिकांना चांगली ऑर्डर मिळू शकते.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )