Chaturgrahi Yog: तूळ राशीत तयार होणार चतुर्ग्रही योग, या तीन राशींना मिळणार नशिबाची साथ
ज्योतिषशास्त्रातील गोचर कुंडलीनुसार सूर्य, बुध, शुक्र आणि केतु हे ग्रह तूळ राशीत एकत्र येणार आहेत.
Chaturgrahi Yog: ज्योतिषशास्त्रात गोचर कुंडलीला विशेष महत्त्व आहे. कारण ग्रह ठराविक कालावधीनंतर राशी बदल करत असतात. त्यामुळे 12 राशींवर परिणाम जाणवत असतो. काही जणांना शुभ तर काही जणांना अशुभ फळं मिळतात. त्यामुळे ज्योतिषगुरुंची ग्रहांच्या गोचराकडे बारीक नजर असते. जेव्हा एकापेक्षा जास्त ग्रह एका राशीत एकत्र येतात तेव्हा काही योग तयार होतात. हा योग काही राशींसाठी फलदायी ठरणार आहे. 27 ऑक्टोबरला तूळ राशीत चतुर्ग्रही योग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रातील गोचर कुंडलीनुसार सूर्य, बुध, शुक्र आणि केतु हे ग्रह एकत्र येणार आहेत. 27 ऑक्टोबरला चार ग्रहांची युती होणार आहे. यामुळे कन्या, मकर आणि कुंभ राशीला फायदा होईल, चला तर मग जाणून घेऊयात गोचर कुंडलीतील कुठच्या स्थानात ही युती होणार आहे.
कन्या: ज्योतिषशास्त्रानुसार कन्या राशीच्या दुसऱ्या स्थानात चतुर्ग्रही योग तयार होत आहे. हे स्थानाला धनस्थान म्हणून संबोधलं जातं. अशा स्थितीत हा योग कन्या राशीच्या लोकांना विशेष आर्थिक लाभ देईल. या काळात अडकलेले पैसे लवकरच परत मिळतील. नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित लोकांना यश मिळेल आणि उत्पन्न वाढेल. जर तुम्ही तुमचे पैसे कुठेतरी गुंतवण्याचा विचार करत असाल तर हा कालावधी अनुकूल आहे.
मकर: या राशीच्या लोकांसाठीही हा काळ खूप फायदेशीर असणार आहे. या राशीच्या दशम स्थानात हा चतुर्ग्रही योग तयार होत आहे. हे स्थान उद्योग आणि नोकरी संदर्भात मानलं जातं. यामुळे अनेक दिवसांपासून नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना यश मिळेल. नोकरदारांना बढती मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातही नफा होईल.
कुंभ: तूळ राशीत तयार होत असलेला चतुर्ग्रही योग कुंभ राशीच्या लोकांसाठीही शुभ सिद्ध होईल. या राशीच्या नवव्या स्थानात हा योग तयार होत आहे. हे स्थान परदेश प्रवास आणि भाग्याशी निगडीत मानलं जातं. या योगामुळे कुंभ राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. प्रलंबित असलेली कामे लवकरच पूर्ण होतील. परदेश प्रवासाचीही शक्यता आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. त्यामुळे ZEE 24TAAS याची पुष्टी करत नाही.)