Narak Chaturdashi 2023 : वसुबारस, धनतेरसनंतर दिवाळीतील पुढचा महत्त्वाचा दिवस असतो, म्हणजे नरक चतुर्दशीचा. या तिथीला छोटी दिवाळी असंही म्हटलं जातं.  रूप चौदस, नरक चौदस, रूप चतुर्दशी किंवा नरक पूजन या नावानेही देखील हा दिवस ओळखला जातो. धनत्रयोदशी यमराजसाठी यमदीपदान केलं जातं. धनत्रयोदशीला तुम्ही यमराज आणि भगवान श्रीकृष्णांची पूजा केली जाते. अकाली मृत्यूपासून मुक्ती आणि आरोग्य रक्षणासाठी नरक चतुर्दशीच्या पूजेला महत्त्व आहे. धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी आणि दिवाळीच्या आधल्या दिवशी नरक चतुर्दशी साजरी करण्यात येते. मात्र यंदा नरक चतुर्दशी आणि दिवाळी एकाच दिवशी आहे. (choti diwali and narak chaturdashi 2023 know puja vidhi and muhurat auspicious times significance and Abhyanga Snan oil massage and karit fruit)


नरक चतुर्दशी तिथी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंचांगानुसार कार्तिक मासातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी 11 नोव्हेंबर 2023 ला शनिवारी दुपारी 01:57 पासून होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी 12 नोव्हेंबर 2023 ला दुपारी 02:44 वाजेपर्यंत असणार आहे. 


कधी साजरा करायची आहे नरक चतुर्दशी?


हिंदू धर्मानुसार उदय तिथी ही नरक चतुर्दशी 12 नोव्हेंबरला रविवारी साजरी करायची आहे. यंदा छोटी दिवाळी मोठी दिवाळी एकत्र साजरा करायची आहे. यादिवशी  माँ काली, हनुमान जी आणि यमदेव यांची पूजा केली जाणार आहे.  त्यासोबत या दिवशी ब्रम्ह मुहूर्तावर अभ्यंगस्नान करण्याची परंपरा आहे. 


नरक चतुर्दशी 2023 ची पूजा विधी  


नरक चतुर्दशीच्या दिवशी यमराज, श्रीकृष्ण, काली माता, भगवान शिव, हनुमानजी आणि विष्णूजींच्या वामन स्वरूपाची विशेष पूजा करा. या सर्व देवी-देवतांच्या मूर्ती घराच्या ईशान्य कोपर्‍यात स्थापित करा आणि त्यांची यथायोग्य पूजा करणे शुभ मानले जाते. देवतांच्या समोर धूप दिवे लावा, कुंकुम तिलक लावा आणि मंत्रांचा उच्चार करुन पूजा संपन्न करा.  


अभ्यंगस्नानाची वेळ 


अभ्यंगस्नानाची वेळ 12 नोव्हेंबर 2023 ला -  सकाळी 05:28 ते 06:41 वाजेपर्यंत 


अभ्यंगस्नान कसं करावं?


दिवाळी सणातील अभ्यंगस्नानाला भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व आहे.  नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून ब्रह्म मुहूर्तावर अभ्यंगस्नान म्हणजे तेल, उटणे लावून स्नान करावं.  'तेल, उटणे अंगाला लावून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट आणि अहंकाराचं उच्चाटन होतं, अशी धर्मात मान्यता आहे. अंघोळ केल्यानंतर 'कारेटं' अंगठयाने फोडण्याची प्रथा आहे. अभ्यंगस्नान झाल्यानंतर मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घ्यावे. त्यानंतर फराळाचं पदार्थ देवाला नैवेद्य म्हणून दाखवून आपण प्रसाद म्हणून घरातील सर्व सदस्य मिळून एकत्र ग्रहण करावे. आज अनेक ठिकाणी पहिल्या आंघोळीनंतर शहरात तरुण तरुणी एकत्र भेटतात आणि दिवाळीचा उत्साह साजरा करतात. तर दिवाळी पहाटचा आनंद लुटतात.


नरक चतुर्दशी का फोडले जातं कारिट?


अभ्‍यंगस्‍नानापूर्वी कारिट नावाचं फळ फोडण्‍याची परंपरा महाराष्‍ट्रात अनेक ठिकाणी आजही पाळलं जातं. ते फळ नरकासूर या राक्षसाचं प्रतिक मानलं गेलं आहे. या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्‍यंगस्‍नानाच्‍या पूर्वी घराबाहेर किंवा तुळशी वृदांवनाजवळ डाव्‍या पायाच्‍या अंगठ्याने कारिट ठेचलं जातं. अभ्‍यंगस्‍नानाच्‍या आधी कारिट फोडून नरकासुराचा प्रतिकात्मक वध केलं जातं. खरं तर एका अर्थाने त्या रुपात आपल्या मनातील सारी कटुता, दुष्टतेचा नाश केला जातो. त्‍यानंतर मंगल स्नानाने पवित्र होऊन अभ्यंगस्नान करणाऱ्या व्यक्तीला कुंक लावून औक्षवान केलं जातं. 


अभ्यंग स्नानाचं महत्त्व


हे अभ्यंग स्नान करणे अत्यंत फलदायी मानलं जातं. नरक चतुर्दशीला शुभ मुहूर्तावर स्नान केल्याने नरकाच्या भयापासून मुक्ती मिळतं असं म्हणतात.  स्नानानंतर दक्षिण दिशेला हात जोडून यमराजाची प्रार्थना केल्यास वर्षभरात केलेली पापं नष्ट होतात, अशी मान्यता आहे. 


शास्त्रशुद्ध अभ्यंग स्नान कसे करावे ?



नरक चतुर्दशी साजरा करण्यामागील कारण


पौराणिक कथेनुसार नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अत्याचारी आणि दुष्ट राक्षस नरकासुरचा वध केला होता. 16,100 मुलींना नरकासुराने आपल्या कैदेत ठेवलं होतं, श्रीकृष्णाने या मुलींना नरकासुराच्या बंदिवासातून मुक्त केलं आणि पत्नी सत्यभामाच्या मदतीने 16,100 मुलींशी श्रीकृष्ण यांनी विवाह केला. मुलींच्या बंधनातून मुक्ती आणि नरकासुराच्या वधाच्या स्मरणार्थ नरक चतुर्दशीच्या दिवशी दीपदानाची परंपरा सुरू झाली. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)