Jyotish Tips : Christmas निमित्त तुम्ही `या` गोष्टी दान किंवा Gift देणार असाल, तर थांबा, नाहीतर व्हाल कंगाल
Vastu Tips : क्रिसमस आणि नवीन वर्षानिमित्त जर तुम्ही कोणाला गिफ्ट किंवा दानधर्म करण्याचा विचार करत असाल तर आधी ही बातमी वाचा, अन्यथा तुमच्यावर आर्थिक संकट कोसळू शकतं.
Jyotish Tips : आज ख्रिसमस (Christmas 2022) ...त्यामुळे आज अनेक जण गिफ्टची देवाणघेवाण करतं. शिवाय अवघ्ये काही दिवसावर न्यू इयर (happy New Year 2023) आहे. तर नवीन वर्षात अनेक जण दानधर्म करतात. जर तुम्ही कोणाला गिफ्ट (Christmas Gift) देण्याचा विचार करत आहात किंवा दानधर्म (donate) करण्याचा विचार करत असाल तर आधी ही बातमी वाचा. कारण भारतीय शास्त्रात दान धर्म आणि भेटवस्तू (Gift) देण्याबद्दल काही नियम सांगण्यत आले आहेत. या नियमाचं पालन न केल्यास तुमच्यावर आर्थिक संकट (financial crisis) कोसळू शकतं.
ज्योतिषशास्त्रातही वेगवेगळ्या ग्रहांच्या शांतीसाठी आणि समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तूंचं दान करण्याचा सल्ला दिला जातो. ज्योतिषाचार्य पंडित रामदास यांच्या मते प्रत्येक व्यक्तीने सर्वस्व दान करू नये. असं केल्यानं तुमच्यासाठी अशुभ घडू शकतं. उदाहरणार्थ, जर तुमच्या कुंडलीत शनि ग्रहाचं वर्चस्व असेल, शुभ फल देत असेल, तर तुम्ही चुकूनही काळे तीळ, काळी चादर, तेल, शूज इत्यादी दान करू नये. (Christmas 2022 or happy New Year 2023 if you are going to give these things donate or gift then stop, otherwise financial crisis money loss)
या वस्तू कोणालाही भेट म्हणून देऊ नका. अन्यथा, शनि प्रतिकूल होतो आणि वाईट परिणाम देऊ लागतो. चला जाणून घेऊयात त्या कुठल्या वस्तू आहेत ते...
काळे कपडे
जेव्हा शनी किंवा राहू-केतूची दशा अशुभ असेल तेव्हा काळ्या वस्त्रांचं दान करावं असं सांगितलं जातं. तसं नसेल तर काळे कपडे कधीही दान करू नका. असं करणं तुमच्या आरोग्यासाठी वाईट ठरू शकतं. यामुळे इतर शुभ ग्रहही बिघडू शकतात. जर तुम्हाला एखाद्याला कपडे दान करायचे असतील तर हलक्या रंगाचे कपडे किंवा इतर रंगाचे कपडे द्या. काळे कपडे कधीही देऊ नका.
मीठ
ज्योतिषशास्त्रात मीठ दान करण्यास मनाई आहे. मजबुरीने कधी कुणाला मीठ द्यायचं असेल तर त्याबदल्यात एक रुपया जरी घेतला तरी तो घ्यावा. यासाठी तुम्हाला दोषी वाटणार नाही. मीठ दान केल्याने माणूस ऋणी होतो. कधी कोणाकडे मीठ मागायचे असेल तर त्या मिठाच्या बदल्यात काहीतरी द्यावेच, मीठ कधीच फुकट घेऊ नये.
हार्डवेअर
शनीच्या दशेत लोखंडाचं दान करावं किंवा मंदिरात ठेवावं असा सल्ला दिला ज्योतिषाशास्त्रात देण्यात आला आहे. लोखंडाचं दान केल्याने शनीचा कोप होतो. असं करणे तुमच्या मालमत्तेसाठी, बँक बॅलन्ससाठी घातक ठरू शकतं. तसंच शनिवारी कधीही लोखंड खरेदी करू नका हे लक्षात ठेवा. शनिवारी लोखंड खरेदी करणे देखील तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)