मुंबई : पाश्चिमात्य देशांमध्ये ख्रिसमस अर्थात नाताळ सणाची एकच धूम पाहायला मिळते. भारतातही नाताळ सण विविध पद्धतींनी साजरा केला जातो. डिसेंबर महिन्याची चाहूल लागल्यापासूनच या सणासाठीची तयारी सुरु होते. घराची सजावट करण्यापासून ते अगदी ऑफिस, दुकानं, मॉल इथंही सजावटीचा घाट घातला जातो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ख्रिसमस सेलिब्रेशनमध्ये सर्वाधिक महत्त्वाची बाब म्हणजे ख्रिसमस ट्री. अनेकदा घरात हे सुंदर झाड आणत त्याची सजावट करण्याचा बेत बरेचजण आखताना दिसतात. 


तुम्हाला माहितीये का, या ख्रिसमस ट्रीचे नेमके काय आणि कसे परिणाम होतात? 


वास्तुशास्त्रात दिलेल्या माहितीनुसार या झाडात खूप काही दडलं आहे. 


शुभ असते Christmas Tree 
वास्तुशास्त्रानुसार घरात Christmas Tree असणं, त्याची सजावट केली जाणं अतिशय शुभ असतं. त्याच्यामुळे सकारात्मकता आणि आनंदी वातावरणाची घरात बरसात होते. 


घरातील नकारात्मकता दूर करण्यात Christmas Tree  मोलाचा हातभार लावतं. फक्त हे ख्रिसमस ट्रीच नव्हे, तर सांताक्लॉझसुद्धा वास्तुशास्त्राच्या दृष्टीनं महत्त्वाचा मानला गेला आहे. 


Christmas Tree ची सजावट करताना घ्यायची काळजी... 
Christmas Tree घराच्या दक्षिण भागात लावू नये. असं केल्यास ते अशुभ ठरेल. उत्तर आणि पूर्व दिशेला Christmas Tree लावणं फायद्याचं ठरेल. 


घराचं अंगण किंवा लॉनमध्ये ख्रिसमस ट्री लावणं शुभसूचक असेल. असं केल्यास घरात कधीही पैशांची कमतरता नसेल. 


ख्रिसमस ट्री सजवताना त्याचा आकारही अंदाजात घेतला गेला पाहिजे. अतिशय सुरेख पद्धतीनं केलेल्या सजावटीमुळं कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमभावना वाढण्यासही मदत होते. 


(सदरील माहिती सामान्य मान्यता आणि माहितीवर आधारलेली आहे. झी24तास याची खातरजमा करत नाही.)