Horoscope 30 August 2022 : कसा असेल आजचा दिवस, कोणी व्हायचं सावध, कोणाला मिळणार धनलाभ? जाणून घ्या
या राशीसाठी नोकरीच्या क्षेत्रात प्रगतीचा योग आहे.
मेष- अगदी स्पष्टपणे निर्णय घ्या. कार्यक्षेत्राला प्राधान्यस्थानी ठेवा. स्मार्ट काम करण्यावर भर द्या. नोकरीच्या क्षेत्रात प्रगतीचा योग आहे.
वृषभ- नोकरी आणि शिक्षण क्षेत्रात चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे. नव्या योजना आखा आणि त्या अनुषंगानं काम करण्याला प्राधान्य द्या.
मिथुन- कुटुंबीयांशी असणारे नातेसंबंध आणखी दृढ होतील. महत्त्वपूर्ण माहिती इतरांनाही द्या, सर्वांचा फायदा यातच आहे. वाद मिटवण्यासाठी पुढाकार घ्या.
कर्क- दीर्घकालीन योजना आखण्यावर भर द्या. दूरदृष्टी ठेवा, त्या धर्तीवर निर्णय घ्या. तुम्हाला लाभ होईल. आर्थिक पाठबळ मिळेल, उधार घेतलेले पैसे आज परत मिळतील.
सिंह - जवळच्या व्यक्तींची भेट घेण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. दिनचर्या आखा. राहणीमान सुधारेल. दिलेल्या शब्दाला जागा.
कन्या- करिअरमध्ये मोठे निर्णय घ्याल. निर्धारित लक्ष्य पूर्ण करण्यावर भर द्या. व्यापारावर लक्ष केंद्रित करा. नव्या आर्थिक वाटा तुम्हाला गवसतील.
तुळ- नातेसंबंध सुधारण्यावर भर द्या. घरात सुखशांती नांदेल. एखादं नवं वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे. विरोधी सक्रिय असतील.
वृश्चिक- अर्थार्जनाच्या नव्या वाटा तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. नवे मित्र बनवाल. नवं काहीतरी शिकण्यासाठी पुढाकार घ्याल.
धनु- समाजात असणारी प्रतिष्ठा वाढेल, जबाबदाऱ्या वाढतील. नोकरीच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. भविष्याच्या अनुषंगानं महत्त्वाच्या संधी मिळतील. धनलाभ होण्याचा योग आहे.
मकर- तुमच्या वाट्याला आज यश येणार आहे. सर्वांशी मिळूनमिसळून वागा. सलोखा वाढवा. समामाजिक स्तर उंचावेल.
कुंभ- शिकवणीतून पुढे जाल. पाहुण्यांची वरदळ वाढेल. कुटुंबात आनंद नांदेल. इतरांशी नम्रतेनं वागा.
मीन- अडकलेली कामं पूर्ण करा. उद्योग आणि व्यापार वाढवा. ज्या कामात हात टाकाल तिथे यश मिळणार आहे. तुमच्यासोबत असणाऱ्यांनाही पुढे आणण्याचा प्रयत्न करा.