Horoscope 17 May 2023  : वैदिक ज्योतिषशास्त्रात 12 राशींचे महत्व सांगितले गेले आहे.  प्रत्येक राशीच्या व्यक्तीच्या दैनंदिन जीवनात ग्रहानुसार बदल होत असतात. या ग्रहांचे राशीवर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम पहायला मिळतात. राशीनुसार 18 मे रोजी राशीनुसार आयुष्यात कोणत्या घडामोडी घडतील जाणून घेवूया. सर्व 12 राशींचे राशी भविष्य.


मेष (Aries)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. नव्या नोकरीची संधी मिळेल. चिडचिड होईल रागावर नियंत्रण ठेवता येणार नाही. नोकरीच्या ठिकाणी मतभेद होतील. व्यवसाय करणाऱ्यांना अधिक मेहनत घ्यावी लागेल.


वृषभ (Taurus)


अनेक दिवसांपासून रखडलेली काम पूर्ण होतील. अचानक धन लाभ होईल. वाढीव खर्च नियंत्रणात येईल.  व्यवसायात प्रगती होईल. नोकरी करणाऱ्यांचा कामाचा व्याप वाढेल. 


मिथुन (Gemini)


आरोग्याची काळजी घ्या. महत्वाच्या कामात बहिण भावाचे सहकार्य मिळेल. व्यवसायात यश मिळेल. जुन्या मित्राचा अचानक भेट होईल.


कर्क (Cancer)


जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक समस्या निर्माण होऊ शकते. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. बोलण्यावर ताबा ठेवा.


सिंह (Leo)


अनावश्यक वादविवाद टाळा. शैक्षणिक किंवा बौद्धिक कार्यात यश मिळेल. अचानक लन लाभ होईल. नोकरीसाठी स्पर्धा परीक्षा आणि मुलाखतीत यश मिळेल.


कन्या (Virgo)


व्यवसायात अडचणी येवू शकतात. खर्च वाढेल यामुळे आर्थिक बजेट कोलमडेल. कुटुंबात धार्मिक कार्य होऊ शकता. नमोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्याशी मतभेद होऊ शकतात. 


तूळ (Libra)


नोकरीत कामाचा ताण वाढेल. नोकरीत बदली देखील होवू शकते. एखाद्या राजकारण्याला भेटण्याचा योग येईल.व्यवसायात अडचणी येऊ शकतात. भावनांवर नियंत्रण ठेवा. आरोग्याबाबत सावध राहा.


वृश्चिक (Scorpio)


अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे मिळतील. जोडीदाराला आरोग्यविषयी समस्या निर्माण होवू शकतात. व्यवसायात आणि नोकरीत प्रगता होईल.


धनु (Sagittarius)


नोकरीत अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नोकरीच्या ठिकाणी  इच्छेविरुद्ध तुम्हाला कोणतीही अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. यामुळे तुम्हा अस्वस्थ व्हाल. व्यवसायात विचारपूर्वक निर्णय घ्या. 


मकर (Capricorn)


नोकरीनिमित्ताने प्रवासाला जाण्याचा योग येईल. कुटुंबाता मतभेद वाढतील. आरोग्याची काळजी घ्या. जोडीदाराशी जुळवून घ्या. 


कुंभ (Aquarius)


नोकरीत प्रमोशन मिळेल. कुंटुंबासाठी जादा कष्ट घ्यावे लागतील. व्यवसायात अडचणी येवू शकतात. मन अस्वस्थ राहील. मात्र, संयमाने काम करा.


मीन (Pisces)


मुलांच्या तब्येतीची काळजी घ्या. व्यवसायात जास्त मेहनत घ्यावी लागेल.प्रवासाची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल.