मेष- काही नवे अनुभव तुम्हाला मिळतील. अनेक समस्यांवर तोडगा काढण्यात यशस्वी ठराल. जे काही मनात आहे, ते स्पष्टपणे बोला. कौटुंबीक संबंध आणखी दृढ करण्याचा प्रयत्न करा. वेळ चांगला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ- तुमच्यासाठी ही वेळ चांगली आहे. आर्थिक गोष्टींवर लक्ष केंद्रीत करा. प्रत्येक आव्हानासाठी तयार राहा. जुनं नुकसान यावेळी मात्र फायदा देणारं ठरेल. आज हाताशी मोकळा वेळ ठेवा. नोकरीच्या ठिकाणी प्रगती कराल. यश तुमच्याच वाट्याला येणार आहे. 


मिथुन- आज तुम्ही स्वत:च बनवलेल्या योजनांवर विश्वास ठेवाल. पैशांच्या बाबतीत काही महत्त्वाच्या संधी मिळतील. ज्या तुमच्यासाठी फायद्याच्या ठरतील. करिअर आणि नोकरीमध्ये तुम्हाला प्रगतीच्या संधी आहेत. अर्थार्जनाच्याही नव्या संधी मिळतील. 


कर्क- काही लोकांशी संबंध बनवण्याचा आणि ते आणखी दृढ करण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणशी संबंधित काही गोष्टींचा उलगडा होईल. तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण होतील. व्यवसायात प्रगती करण्याची शक्यता आहे. 


सिंह- तुमच्या कार्यक्षेत्रात पुढे जाण्याची संधी आहे. कितीही व्यग्र असाल तरी जवळच्या व्यक्तींसोबत ताळमेळ साधण्याचा प्रयत्न करा. जास्तीची मिळकत मिळणार आहे. अर्थार्जनाच्या अधिक संधी मिळतील. शुभकार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. 


कन्या- तुमच्यासाठी ही वेळ चांगली आहे. एखादा पार्टटाईम जॉब मिळण्याची संधी आहे. जास्तीत जास्त कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. हा वेळ तुमच्यासाठी चांगला आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे. पण, थोडा संयम ठेवा. अजिबात घाई करु नका. 


तुळ- आजची वेळ तुमच्यासाठी चांगली आहे. पैशांशी निगडीत अडचणी दूर होतील. कोणा एका खास व्यक्तीचा सल्ला मिळेल. जमिनीचे व्यवहार मार्गी लागतील. जास्तीत जास्त कामं पूर्ण करण्यावर भर द्या. 


वृश्चिक - काही गोष्टी अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी तुम्हाला सहकार्य मिळणार आहे. लोक तुमच्या वक्तव्याने प्रभावित असतील. या संधीचा तुम्ही फायदा घ्या. पैसे कमवण्याच्या नव्या संधी मिळतील. फक्त योग्य वेळी योग्य संधी हेरण्याचा प्रयत्न करा. 


धनु- अनेक गोष्टी चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करा. एकट्यानेच सर्व कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आत्मविश्वास वाढलेला असेल. अनेक वादांवर तोडगा निघेल. 



मकर- संधी मिळाल्यास थोडा आराम करा. कोणत्याही योजनेवर तुम्ही काम करण्याचा बेत आखत असाल. तर, परिस्तिती सुधारण्याची संधी आहे. साथीदारासाठी एखादा लहानमोठा बेत आखाल. 


कुंभ- कायदेशी कामांमध्ये शुभवार्ता कळेल. इतरांशी ताळमेळ वाढेल. लवकरच तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. जुन्या गुंतवणुकीची संधी मिळेल. कुटुंब आणि समाजाकडून आदर मिळेल. 


मीन- तुमचे विचार स्पष्टपणे सर्वांपुढे ठेवण्याचे प्रयत्न करा. कामाच्या बाबतीत तुमची इतरांशी चर्चा होईल. तुम्ही प्रयत्न कराल तर यशस्वी व्हाल. कोणा एका व्यक्तीला अचानक भेटण्याची संधी आहे. पैसे कमवण्याचे अनेक मार्ग समोर असतील. संयमाने योग्य तोच मार्ग निव़डा. घाई करु नका.