मेष- एखादं मोठं काम करण्याची संधी मिळेल. अर्थार्जनाच्या चांगल्या संधी मिळतील. कोणा एका व्यक्तीवर प्रेम व्यक्त करण्यासाठी ही वेळ योग्य आहे. जुनं दुखणं दूर होईल. जास्त मेहनत करावी लागू शकेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ- विचारपूर्वचपणे गुंतवणूक करा. देवाणघेवाणीच्या बाबतीत सावधगिरी बाळगा. दिवसभर तुम्हाला सावध राहण्याचं कारण म्हणजे तुमची वर्तणूक. साठवलेले पैसेही खर्च होतील. एखादी जखम होऊ शकते. 


मिथुन- देवाणघेवाणीच्या व्यवहारांमध्ये काळजी घ्या. नोकरीच्या ठिकाणी जास्तीची मेहनत करावी लागू शकेल. खाण्यापिण्याच्या सवयी ध्यानात ठेवा. दैनंदिन काम पूर्ण होतील. 


कर्क- विचाराधीन कामं पूर्ण न झाल्यामुळे तुम्ही खिन्न असाल. आज धनलाभ होण्याची शक्यता आहे. बेजबाबदारपणे वागू नका. कुटुंबातील व्यक्तींची काळजी घ्या. 


सिंह- कामात यश मिळेल. फायद्याचे करार होतील. नोकरीसापेक्ष लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. दाम्पत्य जीवन आनंददायी असेल. आज जास्त मेहनत करण्यासाठी तयार राहा. तुम्हाला याचा फायदा होणार आहे. 


कन्या- आज तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल. पण, अर्थातच त्याचा फायदाही मिळेल. व्यापाराच प्रगती करण्याची संधी आहे. नोकरीसापेक्ष लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जोडीदारासोबत बाहेर जाण्याचे योग आहेत. 


तुळ- विचार करुनच पैशांची गुंतवणूक करा. कामाची टाळाटाळ करु नका. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. साथीदाराच्या भावनांचा विचार करा. 


वृश्चिक- व्यापारात तणावाची परिस्थिती वाढेल. सावध राहा. आज आरोग्याची काळजी घ्या. एखाद्या बाबतीत नुकसान होऊ शकतं. कोणतंही नवं काम सुरु करु नका. 


धनु- अचल संपत्ती फायद्याची ठरणार आहे. व्यापारी वर्गासाठी आजचा दिवस चांगला आहे. प्रेमसंबंधांसाठीही आजचा दिवस चांगला आहे. नोकरदार वर्गासाठी आज आनंदवार्ता कळणार आहे. 



मकर- बेरोजगारांना आज नोकरीची संधी मिळणार आहे. व्यापारात लाभ होणार आहे. अडकलेली कामं मार्गी लागतील. सावधगिरीने वाटचाल करा. 


कुंभ- नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. जुन्या योजनांचा आज तुम्हाला फायदा होणार आहे. सांभाळून राहा. 


मीन- व्यापारात कोणताही निर्णय़ घेताना सावधगिरी बाळगा. नुकसान होण्याची शक्यता आहे. एखाद्या कामातील तणाव वाढू शकतो. खर्च वाढू शकतात. तुम्ही आखलेला बेत आज फसू शकतो.