आजचे राशीभविष्य | गुरूवार | २८ मार्च २०१९
जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस
मेष - काही कामात अडचणी येऊ शकतात. मेहनत करावी लागेल. नोकरीत बदल करण्याची इच्छा होऊ शकते. परंतु विचार करून निर्णय घ्या. कामात घाईगडबड केल्याने नुकसान होऊ शकते. तब्येतीची काळजी घ्या. नवीन वाहन किंवा मोबाईल खरेदीचा विचार कराल. पैसे सेव्हिंगसाठी एखाद्या व्यक्तीची मदत घ्याल. गुंतवणूकीविषयी विचार कराल. जोडीदाराचा मूड चांगला राहील. वैवाहिक आयुष्य सुखकारक राहील.
वृषभ - व्यवसायात फायदा होईल. नोकरदार लोकांची बढती होऊ शकते. सोबत काम करणाऱ्यांचे सहकार्य मिळेल. जोडीदाराची मदत मिळेल. अविवाहित लोकांचे प्रेमसंबंध चांगले राहतील. कामकाजात बदल होऊ शकतात. त्यामुळे फायदा होईल. कामाचे टेंशन कमी होईल. करियरमध्ये पुढे जाण्यासाठी काही चांगल्या संधी मिळू शकतात. कमाईत वाढ होण्याची शक्यता आहे.
मिथुन - ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी खास आहे. सक्रिय राहाल. ऑफिसमध्ये नवीन काम किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. अडकलेली कामं पूर्ण होऊ शकतात. नवीन लोकांशी ओळखी होतील. जोडीदाराच्या मदतीने धनलाभ होऊ शकतो. भावनिक आधार मिळेल. सामाजिक किंवा सामूहिक कामांसाठी लोकांशी भेट होऊ शकते. उत्साही वाटेल. तब्येतीत सुधारणा होईल.
कर्क - ऑफिसमध्ये काही लोकांना इंप्रेस करू शकता. नोकरी बदलण्याचा विचार मनात येईल. यात नशीबाची साथ मिळेल. नवीन सुरूवात केल्यास यश मिळेल. अडकलेले पैसे मिळतील. अचानक फायदा होईल. व्यवसायात नवीन सौदा होऊ शकतो. आत्मविश्वास वाढेल. कौटुंबिक सुख-समाधान मिळेल. एखादी दुर्घटना किंवा जखमी होण्याची शक्यता आहे. सावध राहा.
सिंह - अधिकाऱ्यांकडून मदत मिळणार नाही, व्यवसायात सावध राहावे लागेल. ऑफिस किंवा व्यवसायात जे काम हातात घ्याल, त्यात यश मिळण्याचा योग आहे. व्यवसायासाठी एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. घाई करू नका. एकाकीपणा टाळा. राहलेली कामं पूर्ण करण्यात समस्या येतील. आज मिळणारे पैसे येणाऱ्या काळासाठी जपून ठेवा. जोडीदारासह प्रवास तसेच एखाद्या कार्यक्रमाचे नियोजन होऊ शकते.
कन्या - नोकरी, व्यवसायात मोठ्या गोष्टींवर काही निर्णय किंवा नियोजन होईल. पैशांच्या बाबतीत सुधारणा होईल. नोकरीसंदर्भात एखादा महत्त्वाचा निर्णय घ्याल. जोडीदाराकडून गिफ्ट मिळेल. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला आहे. महत्त्वपूर्ण लोकांशी भेट होऊ शकते. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. तब्येतीत सुधारणा होईल.
तुळ - रखडलेली कामं पूर्ण होतील. नोकरीत सहकार्य न मिळाल्याने समस्या होईल. काही लोक तुमच्या कामाचा विरोध करू शकतात. काही नवीन करण्याचा विचार कराल. येणाऱ्या काही दिवसांत मोठं काम करण्याचे नियोजन करू शकता. जोडीदाराची साथ मिळेल. विवाह प्रस्ताव येऊ शकतात. विवाहित लोकांसाठी दिवस चांगला आहे.
वृश्चिक - व्यवसायात फायदा होईल. नोकरदार वर्गासाठी दिवस चांगला आहे. रखडलेली कामं पूर्ण होतील. जुन्या समस्या पूर्ण होतील. नवीन कामं करण्याची इच्छा होईल. जबाबदाऱ्या पार पाडाल. चांगल्या संधी मिळतील. फायदा होईल. बाहेर फिरायला जाऊ शकता. जोडीदाराची मदत मिळेल. तब्येतीची काळजी घ्या.
धनु - नोकरीत अडथळे येतील. व्यवसाय सावधतेने करा. वायफळ कामात वेळ वाया जाईल. कामासाठी बाहेर जावे लागू शकते. प्रेमसंबंधांत काही बदल होऊ शकतात. वैवाहिक लोकांसाठी दिवस चांगला आहे. आरोग्याची काळजी घ्या.
मकर - जुन्या समस्या संपतील. दिवस अनुकूल आहे. रखडलेली कामं पूर्ण होतील. नोकरी, व्यवसायात नवीन कल्पना येतील. एनर्जी वाढेल. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेऊ नका. जोडीदाराशी वाद-विवादाचे प्रसंग येतील. तब्येत चांगली राहील.
कुंभ - या राशीच्या काही व्यक्तींचा दिवस चागंला जाईल. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांची मदत मिळेल. चांगले बदल होतील. अनुभवी लोकांकडून चांगला सल्ला मिळेल. धनलाभ होऊ शकतो. महत्त्वपूर्ण लोकांशी भेट होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला आहे. तब्येतीची काळजी घ्या.
मीन - अचानक फायदा होईल. जोडीदाराच्या मदतीने धनलाभ होऊ शकतो. कर्ज संपेल. वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवा. ऑफिसमध्ये नवीन काम किंवा जबाबदारी मिळेल. सावधतेने बोला. तब्येतीची विशेष काळजी घ्या.