मेष - एकंदर परिस्थिती पाहता आजच्या कामांची नीट आखणी कराल तर फायदा होईल. नोकरीच्या ठिकाणी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न कराल. मेहनत करा, यशस्वी व्हाल. कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत कराल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ- तुमच्या मतांनी आणि वक्तव्याने जास्तीत जास्त लोकांवर प्रभाव पाडाल. कामाच्या ठिकाणी कनिष्ठांकडून थोडा त्रास होईल. अडकलेली कामं मार्गी लागतील. मित्रांची मदत मिळेल. 


मिथुन- दैनंदिन कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. जबाबदाऱ्यांवर लक्ष ठेवा. तुमच्याकडे असणारी वेळ आणि धैर्यावर विश्वास ठेवा. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. 


कर्क- अर्थार्जनात यश मिळेल. जादाच्या कामांमध्ये तुम्हाला यश मिळेल. जुने वाद मिटतील. इतरांचा दृष्टीकोन समजण्याचा प्रयत्न करा. तुम्ही शुभवार्तेच्या प्रतिक्षेत असाल. 


सिंह- अर्थार्जनात यशस्वी व्हाल. कामाव्यतिरिक्तची इतर आणि जादाची कामं तुम्हाला मिळती. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. 


कन्या- दिवस चांगला आहे. भावनांवर नियंत्रण ठेवलात तर फायदा होईल. कामं वेळेत पूर्ण करा. मानसिक स्थिती सुधारेल. 


तुळ- परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न कराल. चांगल्या वर्तणुकीमुळे काहीजण तुमच्या मदतीला धावून येतील. अडकलेली कामं पूर्ण होतील. नोकरीच्या ठिकाणी मात्र काही कामांमध्ये अडथळा येईल. सर्वांशी विनम्रतेने वागा. 


वृश्चिक- सहजपणे सर्व कामं पूर्ण होतील. इतरांवर तुम्ही प्रभाव पाडू शकणार आहात. अडकलेल्या कामांवर  तोडगा निघेल. मोठ्यांचा  आशीर्वाद मिळेल. कायदेशीर कामांवर लक्ष ठेवा. 


धनु- गेल्या काही दिवसांपासून बेत आखत होतात अशी कामं आज पूर्ण होतील. अपूर्ण इच्छाही काही अंशी पूर्ण होतील. प्रयत्नांना यश मिळेल. काहीतरी नवं शिकण्याची संधी मिळेल. नशीबाची साथ लाभेल. स्वत:वर विश्वास ठेवा. 


मकर- बेरोजगारांना नोकरीच्या संधी आहेत. ज्या गोष्टी सावरणं कठिण आहे त्या सध्या टाळा. मोठी पावलं उचलण्याआधी, मोठे निर्णय घेण्याआधी विचार करा. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. 


कुंभ- दिवस सामान्य असेल. अडचणींपासून स्वत:ला सावरा. कामाच्या ठिकाणी विरुद्ध लिंगाच्या व्यक्तींशी भावनात्मक विषयांवर संवाद होऊ शकतो. तुम्हाला त्यांची मदतही मिळेल. वादांपासून स्वत:ला दूर ठेवा. काही वादांवर तोडगा निघेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. शुभवार्ता कळेल. 


मीन- दैनंदिन कामं पूर्ण होतील. भावंड आणि मित्रमंडळींची मदत मिळेल. काही संकोच दूर होतील. आजचा दिवस व्यग्र असेल. जबाबदारीची कामं समोर येतील. कामाच्या  पद्धतीत सुधारणा करण्याचा दिवस 


- दीपक शुक्ला