मेष - मित्रपरिवार तसेच भावंडांची साथ मिळेल. नवीन कामाची सुरूवात होईल तसेच विचार केलेली कामेदेखील पूर्ण होतील. महत्त्वाच्या कामांची आखणी होण्याची शक्यता आहे. आपल्या जबाबदारीकडे लक्ष द्या. साथीदारासाठी वेळ काढा. आरोग्याविषयी काळजी घ्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ - कोणत्याही नकारात्मक गोष्टीत अडकलात तर महत्त्वाची संधी हुकण्याची शक्यता आहे. आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. विचार करून बोला. दुसऱ्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्या. साथीदारासोबत वाहन चालवताना काळजी घ्या. आरोग्य चांगले राहील.


मिथुन - नवीन कामांसाठी दिवस चांगला आहे. समस्या हाताळण्यासाठी दिवस चांगला आहे. नवीन ऑफर मिळण्याची शक्यता आहे. विचार करत असलेल्या कामाला सुरूवात करा, तुमची कामे लवकर पूर्ण होतील. रोजची कामे करताना कोणतीही व्यत्यय येणार नाही. महत्त्वाच्या कामांसाठी दिवस शुभ आहे. समस्याही लवकर संपतील.


कर्क - प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज होण्याची शक्यता आहे. कोणत्याही गोष्टीसाठी हलगर्जीपणा करू नका. नोकरी, व्यवसायात हलगर्जीपणा किंवा घाई करू नका. विचार केलेली कामे पूर्ण होण्यासाठी काही वेळ लागू शकतो. आज कोणतेही काम करताना अधिक मेहनत घ्यावी लागेल. आरोग्याची काळजी घ्या.


सिंह - आज तुम्ही विचार केलेली कामे पूर्ण होणार नाहीत. अनेक विचारांनी मनात गोंधळ निर्माण होईल. पैसे जपून वापरा. बोलण्यावर ताबा ठेवा. कोणत्याही नवीन कामांचा विचार करू नका. सांभाळून राहा. कामात मन न लागल्याने कामातील समस्या वाढू शकते. आरोग्यासाठी दिवस उत्तम आहे.


कन्या - व्यवसायात नवीन योजनांवर काम सुरू होऊ शकते. साथीदाराची साथ मिळेल. प्रेमसंबंधांसाठी दिवस उत्तम आहे. आज महत्त्वाच्या लोकांची भेट होऊ शकते. अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होऊ शकतात. कामावर लक्ष द्या. आरोग्य उत्तम राहील. मन प्रसन्न राहील.


तुळ - दिवस उत्तम आहे. परिस्थितीचा फायदा घेऊन तुमची कामे पूर्ण करू शकता. कामात मन लागेल. अचानक चांगली संधी मिळू शकते. त्याचा फायदा घेऊ शकता. अचानक मनात आलेल्या बदल फायदेशीर ठरू शकतात. साथीदाराची साथ मिळेल. आरोग्य उत्तम राहील.


वृश्चिक - नोकरी, व्यवसायात अचानक निर्णय घ्यावे लागू शकतात. नुकसान होण्याची शक्यता आहे. गोंधळ होण्याची शक्यता आहे. वायफळ खर्च होऊ शकतो. कामावर अडचणी येऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या. 


धनु - आर्थिक परिस्थिती चांगली राहील. वैवाहिक जीवन उत्तम राहील. समजूतदारपणे गैरसमज दूर करू शकाल. धन लाभाची शक्यता. मोठ्या समस्या दूर होऊ शकतात. संततीची साथ मिळेल. नवीन लोकांशी ओळखी होऊ शकतात. नोकरी, व्यवसायातील समस्या दूर होतील. आरोग्याची काळजी घ्या.


मकर - आज दिवसभर सावधगिरी बाळगा. काही लोक स्वत:च्या स्वार्थासाठी समस्या निर्माण करू शकतात. जुन्या विचारांत मन अडकून राहील. काही समस्यांचे निराकरण लगेच होणार नाही. काही महत्त्वाची कामे अर्धवट राहण्याची शक्यता. कामात मन लागणार नाही. आरोग्यसाठी दिवस चांगला आहे.


कुंभ - कामावर स्वत:ला नियंत्रणात ठेवा. पदोन्नती होण्याची शक्यता आहे. कामावरील समस्या संपू शकतात. तुमच्या योजना यशस्वी होतील. पुढील कामांसाठी योजना आखण्यास दिवस चांगला आहे. राहिलेली कामे पूर्ण होतील. समस्याचे निराकरण होईल. आरोग्याची काळजी घ्या.


मीन - व्यवसायात समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. कामात मन लागणार नाही. नोकरी, व्यवसायात घाई करू नका. तणाव वाढण्याची शक्यता आहे. केलेल्या कामाचा परिणाम न मिळाल्यास काळजी करू नका. जेवण वेळेवर करा. आरोग्याची काळजी घ्या. 
 


-दीपक शुक्ला