Horoscope 20 october 2022 : (Diwali 2022) दिवाळीच्या निमित्तानं सध्या सर्वत्र सकारात्मक वातावरण पाहायला मिळत आहे. याच सकारात्मकतेचा फायदा आजपासून काही राशींना होणार आहे. एक दिवस आधीच त्यांची दिवाळी सुरु होणार आहे, पाहा यात तुमची रास आहे का... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries Horoscope Today)
कुटुंबामध्ये जवळीक वाढेल. आपल्या माणसांचा सल्ला तुम्हाला मोठं करणार आहे. वरिष्ठांना मान द्या. आजचा दिवस उत्साहानं परिपूर्ण आहे. 


वृषभ (Today Taurus Horoscope)
आर्थिक कामांना वेग मिळणार आहे. अडकलेली कामं मार्गी लावा. आज अर्थार्जनाची नवी संधी मिळणार आहे. कर्ज फेडण्यासाठी आज तुमच्याकडे पुरेसे पैसे असतीलय लागलीच कर्ज फेडा. 


मिथुन (Today Gemini Horoscope)
राहणीमानात मोठा बदल होणार आहे. हा बदल सकारात्मक असेल. विविध क्षेत्रांतून तुम्हाला शुभवार्ता मिळणार आहे. 


कर्क (Cancer Horoscope Today)
तुमच्या प्रयत्नांना आज यश मिळणार आहे. स्वत:वर लक्ष केंद्रीत करा. सकारात्मकतेचा फायदा तुम्हाला होणार आहे. आजचा दिवस भरभराटीचा आहे. 


सिंह (Leo Horoscope Today)
व्यवसाय वाढणार आहे. तुमच्या कामाची प्रचिती सर्वदूर पसरणार आहे. नियोजनामुळे तुम्ही लहानमोठी संकटंही उधळून लावाल. प्रवासयोग आहे. 


कन्या (Horoscope Virgo Today)
करिअरमध्ये नव्यानं काहीतरी करण्यासाठी पुढाकार घ्याल. उल्लेखनीय प्रकरणांमध्ये तुम्हाला प्रगती करण्याची संधी आहे. विवाहोत्सुकांसाठी एखादं मनाजोगं स्थळ येईल. 


तुळ (Libra Horoscope Today)
जबाबदारी वाढणार आहे. आज कुटुंबीयांसमवेत एखाद्या सुरेख ठिकाणी जाण्याचा बेत आखाल. येणारे दिवस तुम्हाला नवी उर्जा देणारे असतील. 


वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
चहुबाजूंनी तुमचा भाग्योदय अटळ आहे. सकारात्मक परिस्थितीचा फायदा घ्या. व्यवसाय, शिक्षण, नोकरी प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश मिळणार आहे. व्यापार वाढणार आहे. 


धनु (Sagittarius Horoscope Today)
नव्या लोकांच्या संपर्कात येण्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. कोणत्याही वादात पडू नका. समस्यांवर आपोआपच तोडगा निघणार आहे. मोठ्यांचा सल्ला फायद्याचा ठरणार आहे. 


मकर (Today Capricorn Horoscope)
तुमच्या मनाचा मोठेपणा तुमची ओळख ठरणार आहे. सहजीवनामध्ये काही आनंदाचे क्षण अनुभवण्याची संधी मिळणार आहे. नोकरीत यश मिळणार आहे. 


कुंभ (Today Aquarius Horoscope)
आज इतरांशी विनम्र असाल. तुमचं कामच सर्व ठिकाणी बोलणार आहे. दिवस सकारात्मक आणि भरभराटीचा आहे. 


मीन (Pisces Horoscope Today)
विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष द्या. यश तुमच्यापासून दूर नाही. उत्साह वाढेल. मोठ्यांचं म्हणणं ऐका.