Horoscope 02 October 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


आजच्या दिवशी बोलण्यात गोडवा ठेवा. दुसर्‍या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे तुमच्या जोडीदाराशी वाद होऊ शकतात.


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी घरातून बाहेर पडताना ज्येष्ठांचे चरणस्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घ्या. आरोग्याची काळजी घ्या.


मिथुन (Gemini)


आजच्या दिवशी नोकरीतील बदलाशी संबंधित कोणताही निर्णय तुम्ही काळजीपूर्वक घ्या. परदेशातून शिक्षण घेण्याची संधीही मिळेल.


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी जर तुम्ही आधी कोणतीही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्याचा पूर्ण फायदा मिळेल. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी जास्त कामाचा ताण जाणवेल. 


सिंह (Leo)


आजच्या दिवशी विद्यार्थी एका शहरातून दुसऱ्या शहरात शिक्षणासाठी जाऊ शकतात. दूरच्या नातेवाईकाकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. 


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत आहात त्यात तुम्हाला यश मिळेल. तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण करा. 


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्ती मुलांच्या भविष्यासाठी पालक पैसे गुंतवतील. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण जास्त असेल, परंतु तुम्ही सर्व कामे वेळेवर पूर्ण करू शकाल.


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी व्यवसायात कोणताही निर्णय घेताना संभ्रमात राहाल. प्रॉपर्टी डीलिंगचे काम करणाऱ्या लोकांना चांगला व्यवहार मिळेल.


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी मन:शांतीसाठी धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा. मित्राच्या मदतीने तुम्हाला रोजगार मिळेल. 


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी व्यवसाय करणारे लोक व्यवसायातील रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करू शकतील. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्याची घाई करू नका.


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी अनावश्यक राग आणि वादविवाद टाळावे लागतील. सरकारी क्षेत्रातूनही तुम्हाला लाभ मिळतील. 


मीन (Pisces)


आजच्या दिवशी भावनांवर नियंत्रण ठेवा. परदेशातून आयात-निर्यातीचे काम करणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )