Horoscope 10 February 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


आजच्या दिवशी लोकांच्या मनात काय सुरु आहे, याचा अंदाज येईल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास होऊ शकतो. एखादी गुंतवणूक चांगला फायदा मिळवून देईल.  


मिथुन (Gemini)


आजच्या दिवशी जमीनजुमल्याचे व्यवहार करणाऱ्यांना यश मिळेल. इतरांसमोर स्वत:ची बाजू स्पष्टपणे मांडा.


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी कोर्टकचेरीचे एखादे प्रकरण उद्भवण्याची शक्यता आहे.  नोकरीच्या ठिकाणी इतरांवर प्रभाव पाडाल.


सिंह (Leo)


आजच्या दिवशी तुम्ही एखादे काम कोणत्याही परिस्थितीत पार पाडाल. व्यवसायातील करारांविषयी गांभीर्याने विचार कराल. 


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी राहणीमानात काही महत्त्वाचे बदल होऊ शकतात. चांगल्या बदलाच्या काळातून प्रगतीपथावर जाण्याची चिन्हं आहेत.


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये लवकरच काही चांगल्या संधी मिळण्याची चिन्हं आहेत. कामं पूर्णत्वास जाऊन त्याचा फायदा मिळेल.


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी वेळेसोबतच काही अडचणी सहजपणे दूर होतील. प्रत्येक कामासाठी शारीरिक आणि मानसिक रितीने तयार राहा.


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी अनेक रेंगाळलेली कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. प्रत्येक बाबतीत खुलेपणाने विचार करा.


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी काही अडचणींवर व्यवहारी मार्गांनी तोडगा काढाल. महत्वाची बाब म्हणजे भूतकाळाला विसरून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. 


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी तुम्ही जो विचार करताय त्यासाठी तुम्ही ठाम राहा. तुमचा आजचा सल्ला लोकांसाठी महत्वाचा ठरेल. 


मीन (Pisces)


आजच्या दिवशी नोकरीच्या ठिकाणी एखादी नवी सुरुवात करण्याची हीच वेळ आहे. काही अशा गोष्टी समोर येतील ज्या भविष्यात फायद्याच्या ठरतील.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )