Horoscope 11 May 2024 : आज विनायक चतुर्थी. प्रत्येक दिवस सारखा नसला तरी आजचा दिवस 12 राशींसाठी खास ठरेल. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


आजच्या दिवशी प्रेमसंबंधांमध्ये कोणताही निर्णय घेता येणार नाही. पैशांसंबंधी लक्ष द्यावे लागेल. गणरायाची आराधना करा. 


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी तुमच्या इच्छा पूर्ण होतील. अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या तब्येतीच्या तक्रारींपासून आराम मिळेल. आजचा दिवस शांत असेल. 


मिथुन (Gemini)


आजच्या दिवशी तुमची मतं मांडण्यासाठी योग्य वेळ नाही. नोकरदारवर्गासाठी दिवस चांगला असणार आहे. 


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी व्यवसायात काही नवी पावलं उचलू शकता. प्रेमसंबंधांसाठी आजचा दिवस ठरेल खास. गणरायाची आराधना करणे खास ठरेल. 


सिंह (Leo)


आजच्या दिवशी विचार केलेली कामे पूर्ण होण्यास थोडा वेळ लागेल. त्यामुळे बाप्पाची आराधना करा. अनेक प्रकारच्या विचारात तुम्ही अडकू शकता.


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी  मनात कोणती तरी समस्या आणि काळजी राहील. कामात मन न लागल्याने त्रास वाढू शकतो. पण आज शांत राहा. 


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्तींना कोणतेही काम करताना जास्त मेहनत करावी लागेल. अचानक मनात बदल होतील जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील  


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी व्यवसायात अचानक काही निर्णय घ्यावे लागतील. कर्ज घेण्याचे मन होऊ शकते. तुमच्या मोठ्या अडचणी दूर होऊ शकतील. पण विचार करुन निर्णय घ्या. 


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी नवीन योजना यशस्वी होतील. लव लाईफसाठी दिवस चांगला राहील. ठरवलेली काही कामे पूर्ण होतील. दिवस महत्त्वाचा ठरेल.  


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी आवडीची कामे करायला मिळतील. आर्थिक देवाणघेवाण किंवा गुंतवणुकीची योजना आखाल.त्यामुळे आजचा दिवस महत्त्वाचा ठरेल.   


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी काहीजण तुमच्याकडून फार अपेक्षा ठेवतील. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये अडकाल. बढती आणि आर्थिक उन्नती होण्याचा योग आहेत.


मीन (Pisces)


आजच्या दिवशी एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीविषयी कुटुंबीयांशी चर्चा कराल. कोणतीही नवी जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी विचार करा. आजचा दिवस गणरायाच्या स्मरणात ठेवा. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )