Horoscope 14 May 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


आजच्या दिवशी खाण्यापिण्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगा. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. 


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी करु शकता. शुभवार्ता कळू शकेल. जीवनात काय महत्त्वाचे आहे याकडे विशेष लक्ष द्या.


मिथुन (Gemini)


आजच्या दिवशी कामांच्या बाबतीत यश मिळण्याची शक्यता आहे. कोणत्याही कामाचा ताण घेऊ नका.   


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी कोणाच्याही विरोधात जाऊ नका. जोडीदाराच्या भावना समजण्याचा प्रयत्न करा. 


सिंह (Leo)


आजच्या दिवशी नवीन ओळखी होण्याची शक्यता आहे. नवीन प्रेमसंबंध सुरु होण्याची शक्यता आहे. जवळपासच्या लोकांची मदत मिळू शकते. 


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी जुन्या मित्राची भेट होण्याचा योग आहे. पैशांच्या बाबतीत फार विचार करु नका. पैसे कमवण्यासाठी प्रयत्न करा.


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्तींना प्रेम व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. कोणा एका मित्राचा भागीदारीमध्ये फायदा मिळणार आहे.  


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी काही नव्या योजनांमध्ये बदल करावे लागतील. नवीन जबाबदाऱ्या येत्या काळात मिळणार आहेत.  


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी कामात आलेला स्पिडब्रेकर तुम्हाला खूप काही शिकवून जाईल. हा काळ नवीन गोष्टी शिकण्याचा आहे. 


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी नवीन काही तरी करण्याचा विचार सतत डोक्यात येत असेल. रखडलेली काम येत्या काळात पूर्ण होणार आहे.


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी परिस्थिती अनुकूल व्हायला वेळ लागेल. काही तरी महत्वाचा निर्णय घ्या. जुन्या गोष्टी संपणार संपणार असून नवीन योग सुरू होणार आहे.


मीन (Pisces)


आजच्या दिवशी काही नवीन कमविण्याचा मार्ग शोधावा लागणार आहे. अचानक लाभ होण्याची शक्यता आहे.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )