Horoscope 17 July 2024 : हिंदू धर्मात आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशी म्हटली म्हणजे महाराष्ट्रासाठी एक उत्सव पर्व मानलं जातं. ही तिथी पंढरपूरच्या पांडुरंगाला समर्पित आहे. पंचांगानुसार दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी साजरी केली जाते. जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


आजच्या दिवशी जुन्या गोष्टी आणि आठवणी विसरण्याचा प्रयत्न कराल. आपल्या जीवनात काही बदल होत आहेत. काही नवे अनुभव मिळतील.


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी तुमच्या आयुष्यावर प्रभाव टाकतील अशा व्यक्तींशी तुमची ओळख होईल. व्यवसाय करताना अडकलेला पैसा परत मिळू शकेल. 


मिथुन (Gemini)


आजच्या दिवशी जास्तीत जास्त समस्या सोडवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कार्यक्षेत्र आणि व्यवसायात धन लाभ होण्याचे योग आहेत. 


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी कोणती मोठी गुंतवणूक केल्यास तुम्हाला फायदा होईल. काही बदल होण्यास आजपासून सुरूवात होईल.


सिंह (Leo)


आजच्या दिवशी तुम्ही जोडीदारासोबत कुठेतरी फिरायला जाल. काही बदल होण्यास आजपासून सुरूवात होईल.


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी  पैसे कमावणे तुमच्यासाठी सहज बनेल. काही नवीन आणि मजेदार लोकांशी भेटीगाठी होतील.


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्तींना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. काम जास्त नसेल तर दिवस लवकर संपेल ऑफिसमध्ये कोणत्या तरी कामात आलेली अडचण संपून जाईल. 


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तणावाचे वातावरण राहील.  जोडीदार तुम्हाला आर्थिक मदत करु शकतो.


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी ऑफिसमध्ये कोणती व्यक्ती गुप्त रितीने तुमची मदत करेल. तुमच्या फायद्याचा विचार नक्की करा. दुसऱ्यांना नाराज न करता चतुराईने काम करा.


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी परिवारातील लोक तुम्हाला कठीण परिस्थितीत टाकतील. वाद विवादामध्ये अडकून राहाल. आराम केला नाहीत तर त्रास होऊ शकतो. 


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी विचार करुनच निर्णय घ्या. पैशांच्या स्थितीमध्ये चांगले बदल मिळू शकतील. लव लाईफसाठी दिवस चांगला असेल. 


मीन (Pisces)


आजच्या दिवशी अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. साथीदाराकडून एखादी अनपेक्षित भेट मिळेल.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )