Todays Horoscope 19 April 2023 in Marathi : नवीन दिवस नवीन सुरुवात...हा आयुष्य जगण्याचा खऱ्या मंत्र. आयुष्य हे ऊन सावली सारखं आहे. कधी थोडं सुख तर खोडं दु:ख...यालाच तर आयुष्य म्हणतो. प्रत्येकाला उत्सुकता असते की आजचा दिवस आपल्यासाठी काय घेऊन आला आहे. कुंभ राशीसाठी आजचा दिवस खूप शुभ असणार आहे. इतर राशींसाठी कसा असेल जाणून घ्या आजचं राशीभविष्य मराठीत 


मेष (Aries)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असणार आहे. ऑफिसमधील कामात तुम्ही  यशस्वी व्हाल. भूतकाळात केलेली गुंतवणुकीतून आर्थिक फायदा होणार आहे. घरात आनंदाचे वातावरण असणार आहे. जोडीदारासोबत बाहेर जाण्याचा प्लॅन करणार आहात. 


वृषभ (Taurus)


या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे. नवीन व्यक्तीची चाहुल लागणार आहे. नोकरीची ऑफर मिळणार आहे. रखडलेल्या योजना मार्गी लागणार आहेत. कुटुंबातील काही जबाबदाऱ्या तुमच्या खांद्यावर येणार आहेत. ऑफिसमधील दिलेली कामं वेळीत पूर्ण करा. 


मिथुन (Gemini)


या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. दिलेली कामं वेळेत पूर्ण करा.  तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. प्रवासाचे योग आहेत. धार्मिक कार्य आज तुमच्या हातातून घडणार आहे. जुन्या मित्र भेटल्यामुळे आनंद होईल. 


कर्क (Cancer)


कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे.  जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतो. व्यवसायिकांनी कुठलाही निर्णय घेताना शंभर वेळा विचार करावा. आज तुम्ही वाहन खरेदी करु शकता. 


सिंह (Leo)


आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा जास्त चांगला असणार आहे. कुटुबांतील लोकांचं सहकार्य तुम्हाला लाभणार आहे. नोकरीच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. वडिलोपार्जित व्यवसायातून फायदा होणार आहे. राजकारणी लोकांना कामामध्ये यश मिळणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. 


कन्या (Virgo)


या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला असणार आहे. अचानक धनलाभ होणार आहे. प्रत्येक कामात यश मिळणार आहे. जोडीदारासोबत बाहेर जाण्याचा विचार कराल. आर्थिक स्ठिती चांगली होणार आहे. 


तूळ (Libra)


या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी ठरणार आहे. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून आनंदाची बातमी मिळणार आहे. जोडीदारासोबत नातं मजबूत होणार आहे. शॉपिंगवर जाण्याचा प्लॅन करु शकता. जुन्या गुंतवणुकीतून आर्थिक फायदा होणार आहे. 


वृश्चिक (Scorpio)


या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. कुटुंबात शुभ कार्य घडणार आहे. रखडलेली कामं पूर्णत्वाला नेणारा आजचा दिवस ठरणार आहे. आर्थिक स्थिती चांगली होणार आहे. तुम्ही भविष्यासाठी गुंतवणूक करण्याचा विचारत असाल तर आज ते काम करा. 


धनु (Sagittarius)


या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. अविवाहित लोकांचे लग्न मजण्याचा योग आहे. घरात गोड बातमी कळणार आहे. नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. गुंतवणूक करणं टाळा. आरोग्यासाठी पैसा खर्च होणार आहे. 


मकर (Capricorn)


या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडी खुशी थोडा गम असा असणार आहे. मित्राकडून आर्थिक
मदत मागण्याची वेळ येणार आहे. कामात अडचणी येणार आहेत. पण आतापर्यंत तुम्ही केलेल्या चांगल्या कामाचा मोबदला मिळणार आहेत. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढणार आहेत. 


 
कुंभ (Aquarius)


या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस बेस्ट असणार आहे. अनेकांकडून तुमचं खूप प्रशंसा होणार आहे. आरोग्यावर खर्च होण्याची शक्यता आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही आज सकारात्मक बाजू शोधणार आहे. त्यामुळे प्रत्येक संकट असो किंवा कुठलंही काम असतो त्यावर तुम्ही यशस्वी होणार आहात. 



मीन (Pisces)


या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदादायी असणार आहे. नवीन नोकरीची संधी मिळणार आहे. मालमत्ता खरेदीचा योग आहे.  आज तुम्ही तुमचं आवडीच्या कामात मनं रमवणार आहात. जीवनसासाथीसोबत आनंदाचे क्षण घालविणार आहात. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)