Horoscope 19 March 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


आजच्या दिवशी पैशांच्या बाबतीत समस्या कमी होतील. नवीन लोकांशी कामासंबंधी चर्चा होऊ शकते. अनेक बाबींचा विचार करुन पुढील निर्णय घ्या.


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात. तब्येत चांगली राहील. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. 


मिथुन (Gemini)


आजच्या दिवशी समस्या सहजपणे सोडवल्या जातील. कोणावरही अवलंबून राहू नका. अपेक्षा नियंत्रणात ठेवा. 


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नोकरी किंवा व्यवसायांवर बोलणाऱ्यांसाठी चांगली वेळ आहे. 


सिंह (Leo)


आजच्या दिवशी वायफळ काम करण्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करुन आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करा. आज केलेल्या प्रत्येक कामाचा तुम्हाला फायदा होणार आहे. 


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी जोडीदाराकडूनही मदत मिळेल. काही महत्त्वाचे निर्णय तातडीने घ्यावे लागतील त्यासाठी तयार राहा.


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्तींना विवाहास योग्य व्यक्तींना विवाहाचे प्रस्ताव मिळतील. आज तुम्ही दुसऱ्यांच्या भावना सहज समजू शकाल.


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी नोकरी आणि व्यापारात अडचणी वाढतील. व्यवसाय आणि नोकरीमध्ये परिवाराचे सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी विचार करुन बोला.


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी नोकरीच्या ठिकाणी कोणीतरी व्यक्ती नकळतपणे तुमची मदत करत असेल. सामाजिक कामांमध्ये यश मिळेल. 


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी काही खास व्यक्तींना भेटण्याचा योग आहेत. काही नवे आणि सकारात्मक काम कराल. पदोन्नतीमुळे तुमची जबाबदारी वाढेल.


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी कुटुंबात आनंद राहील. विनाकारण धावपळ करु नका.  विचारपूर्वक निर्णय घेण्याचा फायदा होईल.


मीन (Pisces)


आजच्या दिवशी प्रगती आणि फायद्यासाठी काही प्रयत्न करावे लागतील. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. महत्वाच्या व्यक्तींसोबत चांगला वेळ जाईल. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )