Horoscope 19 November 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


आजच्या दिवशी तुम्हाला कोणत्याही कामात अधिक मेहनत घ्यावी लागू शकते. आज घेतलेला एखादा निर्णय भविष्यकाळात फायदेशीर ठरू शकतो.


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी बऱ्याच दिवसांनी आत्मचिंतन करण्याचा योग येईल. काही अशा गोष्टी समोर येतील ज्यामुळे बळ मिळेल.


मिथुन (Gemini)


आजच्या दिवशी व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज अपेक्षित नफा मिळेल. तब्येत सुधारेल आणि नशिब चांगले राहील


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी घरगुती जीवनात काही तणाव राहू शकतो. तुमच्या जोडीदाराचे वागणे तुम्हाला आवडणार नाही.


सिंह (Leo)


आजच्या दिवशी आर्थिक स्थिती चांगली राहील. प्रेम जीवन जगणाऱ्या लोकांसाठीही आजचा दिवस चांगला असणार आहे.


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी तुम्ही मानसिकदृष्ट्या खूप मजबूत असाल. कामाच्या संदर्भात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. 


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्तींचा जोडीदारासोबत दिवस चांगला जाईल. उत्पन्नात प्रचंड वाढ होईल आणि खर्चात घट देखील होईल. 


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास होऊ शकतो. घाईने कोणतंही काम करु नका.


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. आखलेल्या योजना पूर्ण होऊ शकतात.


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी चांगलं बोलण्यामुळे कामं पूर्ण होतील. तुमची विचार करण्याची पद्धत इतरांना आवडेल. 


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी कोणतीही हाती आलेली संधी सोडू नका. पैशांच्या, कुटुंबाच्या स्थितीकडे पूर्ण लक्ष द्यावे लागेल. 


मीन (Pisces)


आजच्या दिवशी पैशांच्या बाबतीत नुकसानीची शक्यता आहे. अचानक घडलेल्या कोणत्याही गोष्टीवर लगेच निर्णय घेऊ नका. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )