Horoscope 24 February 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


आजच्या दिवशी व्यवसायातील रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करण्यात व्यस्त राहाल. कष्टकरी लोकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात दिलेली कामे वेळेत पूर्ण करावी लागतील. 


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी नोकरदारांना नोकरीत बढतीची संधी मिळेल. घरगुती जीवनात सुख-शांती राहील. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.


मिथुन (Gemini)


आजच्या दिवशी व्यवसायाला पुढे नेण्यासाठी तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांमध्ये तुम्हाला यश मिळेल. निरुपयोगी गोष्टींवर पैसे खर्च करणे टाळा.


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याची चिन्हे आहेत. व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित नफा मिळेल.


सिंह (Leo)


आजच्या दिवशी अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. आज आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी पूर्वीपासून सुरू असलेल्या समस्या दूर होतील. आज खर्च वाढण्याची शक्यता आहे.


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्तींना दिवसाच्या शेवटी थकवा जाणवेल. जाहिरात क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी आज सावध राहण्याची गरज आहे. 


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. रखडलेली कामे पूर्ण कराल. नवीन गोष्टी शिकण्याची तुमची उत्सुकता असेल.


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी तुम्हाला वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. नोकरीत यश मिळाल्यानं तुम्ही आनंदी राहाल.    


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी एखाद्या व्यक्तीमुळे तुमच्या नात्यात वितुष्ट येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी निष्काळजीपणा टाळा. 


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळेल. छोट्या व्यावसायिकांना व्यवसायात भरपूर नफा मिळेल. 


मीन (Pisces)


आजच्या दिवशी तुमची रखडलेले कामे पूर्ण होतील. तुम्ही केलेल्या कामाचे सर्वजण कौतुक करतील. नेत्यांना भेटण्याची संधी मिळेल.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )