Horoscope 27 August 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


आजच्या दिवशी नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत विचाराधीन कामं पूर्ण होतील. आर्थिक व्यवहारांमध्ये सुधारणा होईल. श्रीकृष्णाची विशेष कृपा मेष राशीवर राहिल. 


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी कुटुंबावरच तुमचं जास्त लक्ष असेल. वृषभ राशीच्या लोकांनी आज विशेष काळजी घ्या. आरोग्याच्या समस्या डोकं वर करतील. अपूर्ण आणि अडकलेली कामं पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. 


मिथुन (Gemini)


आजच्या दिवशी जुन्या गोष्टी आज फायद्याच्या ठरतील. मिथुन राशीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे.  नवीन जबाबदारी मिळू शकते. मेहनतीचं फळ आज तुमच्या पदरी पडेल.


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी दुसऱ्यांच्या माध्यमातून कामात मदत होईल याचा खूप फायदा होईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. कर्क राशीच्या लोकांनी कुटुंबासाठी वेळ काढावा. 


सिंह (Leo)


आजच्या दिवशी अविवाहित असाल तर त्या बाजूने गोष्टी पुढे सरकतील. नव्या गुंतवणुकीचे बेत आखाल. आजूबाजूला बऱ्याच घडामोडी घडतील. सिंह राशीच्या लोकांनी मुलांची विशेष काळजी घ्यावी. 


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी कोणतंही काम कुठंही अडणार नाही. संकोचलेपणा दूर होईल. करिअरमध्ये लवकरच काही चांगल्या संधी मिळण्याची चिन्हं आहेत. कन्या राशीच्या लोकांची रखडलेली कामे पूर्ण होतील. 


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्तींना गरज पडल्यास अपेक्षित मदत मिळेल. वेळेसोबतच काही अडचणी सहजपणे दूर होतील. तूळ राशीच्या लोकांनी जुनी कागदपत्रे तपासून पाहावीत. यामुळे लाभ होणार आहे. 


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी फायदा मिळवण्यासाठी दिवसभर काहीतरी प्रयत्न करत राहाल. अनेक रेंगाळलेली कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. वृश्चिक राशीच्या बाळगोपाळांनी आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. 


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी धनलाभ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळतील. व्यापाराच्या दृष्टीने एखादा लहानसा प्रवासही फायद्याचा ठरेल. धनू राशीच्या महिलांसाठी सुवर्णसंधी. येत्या आठवड्याभरात कामाची संधी मिळेल. 


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी नवी जबाबदारी तुमच्यावर सोपवण्यात येईल. नोकरीच्या ठिकाणी दिवस चांगला असेल. वरिष्ठांची मदत मिळेल. मकर राशीच्या लोकांनी नातेवाईकांशी थोडं जुळवून घ्यावं. 


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी एखाद्या कामात उलटफेर होण्याची शक्यता आहे. कामाचा व्याप वाढेल. महत्त्वपूर्ण लोकांशी संपर्क वाढेल. कुंभ राशीच्या लोकांनी कामाच्या ठिकाणी शांत राहा. 


मीन (Pisces)


आजच्या दिवशी नोकरी आणि व्यवसायात मन रमेल. काम करण्याच्या पद्धतीत काही बदल घडतील.नवीन घडामोडी घडतील. प्रियजनांना भेटण्याची ओढ लागेल. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )