Horoscope 28 July 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


आजच्या दिवशी कुटुंबियांकडून काही नवीन जबाबदारी मिळू शकते. गरज असेल तेव्हाच पैसे खर्च करा. व्यवसाय करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यासाठी मित्रांची मदत घेतील. 


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी नोकरदार लोक दिलेली कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. चांगली नोकरी मिळाल्यास खूप आनंदी असाल.


मिथुन (Gemini)


आजच्या दिवशी खास व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे मिळतील. तुमच्या गोड बोलण्यामुळे तुम्ही कामे पूर्ण करु शकाल.


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी एखादे मोठे ध्येय पूर्ण केल्यावर तुम्ही आनंदी व्हाल. महत्त्वाच्या व्यावसायिक कामासाठी अचानक प्रवासाला जावे लागेल.  


सिंह (Leo)


आजच्या दिवशी मौल्यवान वस्तूंचे रक्षण करा. नुकसान किंवा साहित्य चोरीला जाण्याची भीती आहे. आर्थिक दृष्टीकोनाबद्दल चिंतित असाल


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी कुटुंबातील तुमच्या जबाबदाऱ्यांकडे पूर्ण लक्ष द्या. काही फसवणूक करणाऱ्या लोकांपासून सावध राहावे लागेल.


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्तींना मुलांकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांनाही उत्पन्नाच्या अनेक संधी मिळतील. 


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना नोकरीत बढतीची संधी मिळेल.


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी वैवाहिक जीवन चांगलं राहील. नोकरीत प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. मनाची कोणतीही इच्छा आज पूर्ण होऊ शकते.


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी कोणत्याही कामात जोखीम पत्करु नका. तुम्हाला पोटाशी संबंधित समस्या होऊ शकतात. खडलेली कामे वेळेत पूर्ण होतील. 


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी जोडीदाराबरोबर एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. तुम्हाला एखादी अपघाती भेट देखील घडू शकते. 


मीन (Pisces)


आजच्या दिवशी मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी फार मोलाचं ठरणार आहे. नवीन प्रयत्नांतून तुम्हाला पैसे मिळू शकतात. व्यवसायात कामाकडे दुर्लक्ष करू नका.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )