Horoscope 28 May 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


आजच्या दिवशी नव्या मित्रमंडळींशी भेटीगाठी घडतील. साथीदाराचा सल्ला फायद्याचा ठरु शकतो. 


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी काही महत्त्वाचे बदल घडण्यास सुरुवात होईल. तुमच्या सल्ल्यांचा इतरांना फायदा होऊ शकतो. 


मिथुन (Gemini)


आजच्या दिवशी पैशांच्या बाबतीन विचारपूर्वक निर्णय घ्या. चांगली वर्तणूक फक्त तुम्हाला यशस्वीच करणार नाही, तर तुम्हाला भेटणाऱ्या इतरांनाही यातून आनंद मिळेल. 


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी नवी कामं सुरु करण्याचा विचार कराल. साथीदारासोबत बाहेर जाण्याचे योग आहेत. दृष्टीकोन कायम सकारात्मक ठेवा. 


सिंह (Leo)


आजच्या दिवशी स्वत:वर विश्वास ठेवा. मेहनत करा. कोणा एका व्यक्तीला तुमच्या मनीची गोष्ट पटवून सांगण्यात यशस्वी ठराल. 


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. चांगल्या संधीच्या शोधात असाल तर ती संधी मिळेल.


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्तींनी विचाराधीन कामंही पूर्ण होतील. धार्मिक कार्यांमध्ये सहभागी व्हाल. करिअरच्या दृष्टीने काही गोष्टींविषयी असणारी शंका दूर होईल.


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी विचारात असणारी सर्व कामं पूर्ण होतील. अनेक महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे.


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी अनेकांचं प्रेम तुम्हाला मिळणार असून, तुमच्या व्यक्तीमत्वाची इतरांवरही छाप पाडाल. कामाच्या ठिकाणी नवी जबाबदारी मिळेल.


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी स्वत: निर्णय घेण्यापेक्षा इतरांचा सल्ला घ्या. आज कोणताही धोका पत्करू नका. त्यासाठी दिवस योग्य नाही. 


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी कोणत्याही गोष्टीचा जास्त ताण येणार नाही यावर भर द्या. अनपेक्षितपणे एखाद्या गोष्टीसाठी तुमची वाहवा होईल. 


मीन (Pisces)


आजच्या दिवशी आयुष्याला कलाटणी देणाऱ्या लोकांची भेट होण्याची शक्यता आहे. बऱ्याच काळापासून असलेली एखादी अडचण सुटणार आहे. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )