Horoscope 28 October 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


आजच्या दिवशी चांगल्या व्यवहारांमुळं तुम्हाला याचा फायदा मिळणार आहे. अनेक कामं वेळीच पूर्ण होतील.


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी काही खास कामं आटोपण्यात मात्र अडचण येऊ शकते. पैसे कमवण्याच्या तुमच्या प्रयत्नांना यश येणार आहे.


मिथुन (Gemini)


आजच्या दिवशी मोठ्यांचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे. जुन्या कामांमध्ये वेग येईल. एखादी शुभवार्ता मिळेल.


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी मेहनतीने धन लाभ होण्याची दाट शक्यता आहे. जीवनात पुढे जाण्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. 


सिंह (Leo)


आजच्या दिवशी सामाजित कामात सन्मान मिळेल.  कामात किंवा व्यवसायात नवीन काम सुरू कराल. आजचा दिवस खूप खास आहे.


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी खासगी गोष्टी कुणाशी शेअर करू नका. दररोजची काम पूर्ण करण्यातच आजचा दिवस जाईल.


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्तींना व्यवसायात लाभ होण्याची दाट शक्यता आहे. अविवाहित लोकांना आजचा दिवस खास आहे. 


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी मोठ्या लोकांकडून आज मदत मिळण्याची शक्यता आहे. अर्धवट राहिलेली सर्व काम पार पडतील.


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी खूप वर्षांपूर्वीच्या मित्राच्या आज गाठीभेटी होतील. लग्न जुळण्याचे संकेत मिळतील. दिवसाची प्लानिंग गुप्त ठेवा.


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी अनावश्यक खर्च टाळा. व्यवसायात एका गोष्टींवरून थोडं तणावाचं वातावरण असेल. घाईगडबडीत काम करू नका.


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी कुटुंबियांसाठी कामातून वेळ काढा. कामाच्या ठिकाणी फायदा होऊ शकतो. पदोन्नती मिळण्याचे संकेत आहेत.


मीन (Pisces)


आजच्या दिवशी कामात मिळालेल्या सहकाऱ्याच्या मदतीमुळे धनलाभ होईल. न्यायालयीन कामकाजातून दिलासा मिळेल. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )