Horoscope 29 December 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


आजच्या दिवशी कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. सकारात्मक विचारांमुळे तशाच गोष्टी घडायला लागतील.


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी आर्थिक स्थिती चांगली होऊ शकते. भूतकाळात घडलेल्या घटनांवरूनच वाद निर्माण होऊ शकतात. 


मिथुन (Gemini)


आजच्या दिवशी कोणत्याही जबाबदारीच्या कामात निष्काळजी राहू नका. बोललेली गोष्ट जिव्हारी लागेल त्यामुळे ती मनावर न घेणं हिताचं. 


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. करियरबाबत अधिक विचार करण्याची गरज आहे.


सिंह (Leo)


आजच्या दिवशी नवे मित्र तर भेटतील मात्र काळजी घ्या. नवीन प्रोजेक्टवर काम करून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल.  


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी मित्रांच्या मदतीने अवघड कामे सहज पूर्ण होतील. अधिक नफा मिळविण्यासाठी व्यवसायात कुटुंबाचं सहकार्य मिळेल. 


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्तींनी ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घ्या. आपल्या सगळ्या अडचणी आज दूर होतील.


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी पैशांची बचत करण्याकडे लक्ष द्या. व्यवसायात आजचा दिवस संमिश्र असेल. आज आपल्याला आनंदाची बातमी मिळेल. 


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी व्यवसायाच्या नव्या संधी मिळतील. साथीदाराचा किंवा सहकाऱ्यांचा मनापासून पाठिंबा मिळेल. 


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी जर तुम्हाला कोणतीही गुंतवणूक करायची असेल तर तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या. आत्मविश्वास सोडू नका.


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी विरोधकांपासून सावध राहा. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला चांगले आरोग्य लाभेल. 


मीन (Pisces)


आजच्या दिवशी जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात. दिवस संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. कौटुंबिक जीवन आनंदी होईल.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )