Horoscope 3 August 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


आजच्या दिवशी बेरोजगार लोकांना मित्राच्या मदतीनं चांगला रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. आज महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. 


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी नोकरदारांना दिलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. अनावश्यकपणे पैसे खर्च करण्यापासून स्वत:ला थांबवा.


मिथुन (Gemini)


आजच्या दिवशी इतरांच्या मदतीनं तुम्ही व्यवसायातील अडचणी दूर करु शकाल. तुम्हाला चांगला आर्थिक नफा मिळेल.


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी काही जबाबदाऱ्या वरिष्ठांकडून तुमच्यावर सोपवण्यात येतील. मित्रांच्या मदतीने तुम्हाला नवीन संपर्क मिळतील.  


सिंह (Leo)


आजच्या दिवशी खास व्यक्तीच्या मदतीने रखडलेले पैसे मिळतील. व्यवसायाला पुढे नेण्यासाठी तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांमध्ये तुम्हाला यश मिळेल.


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी लोक तुमच्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावतील. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही अडचणीत येऊ शकता.


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्तींच्या मनाला शांती मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात येणारे सर्व अडथळे दूर होतील. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल. 


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी नोकरदार लोकांना नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. वडील तुमच्या व्यवसायासाठी पैसे खर्च करतील.


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी जे काही काम हातात घ्याल ते वेळेवर पूर्ण कराल. व्यवसायाशी संबंधित कामानिमित्त बाहेर जाण्याची शक्यता आहे


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी आरोग्याशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळेल. तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल. 


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी हुशारीने गुंतवणूक करा, अन्यथा नुकसान होऊ शकते. व्यवसायात काही नवीन कामांसाठी प्रेरणा मिळेल.  


मीन (Pisces)


आजच्या दिवशी वरिष्ठ सदस्यांकडून काही काम तुमच्यावर सोपवले जाईल. तब्येतीच्या बाबतीत निष्काळजीपणा टाळा.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )