Horoscope 30 May 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


आजच्या दिवशी घाईघाईत कोणताही व्यवसायाचा प्रस्ताव स्विकारू नये. अनोळखी व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवू नका.


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी अनावश्यक खर्चामुळे तुमचे बजेट बिघडण्याची शक्यता आहे. पैशाच्या बाबतीत तुम्ही जास्त बेफिकीर राहू नये.  


मिथुन (Gemini)


आजच्या दिवशी संयमाने तुमच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करणं फायदेशीर ठरणार आहे. तुमच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवा.


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. प्रियकरासोबतच्या नात्यात नवीनता येण्याची शक्यता आहे. 


सिंह (Leo)


आजचा दिवशी भविष्याबद्दलचे विचार काळजीचे कारण बनतील. मानसिक तणावाला सामोरं जावं लागण्याची दाट शक्यता आहे.


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी शत्रूंना तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका. वादग्रस्त मुद्द्यांवर बोलणे टाळणं तुमच्यासाठी योग्य ठरणार आहे. 


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्तींचं आज अहंकारीपणामुळे नुकसान होऊ शकतं. पैशाच्या कमतरतेमुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी नकारात्मक विचार तुम्हाला अडचणीत आणू शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांना सावध राहावे लागणार आहे. 


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी इतरांच्या सहकार्याने व्यवसायात सुधारणा होणार आहे. जुना व्यावसायिक करार तुम्हाला अचानक नफा देणार आहे. 


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी तुमच्या प्रिय व्यक्तीशी तुमचं नातं संपुष्टात येऊ शकतं. व्यवसायाच्या क्षेत्रात तुम्हाला नुकसानीला सामोरं जावं लागेल.  


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी जवळच्या व्यक्तीच्या पाठिंब्याने तुम्हाला खूप फायदा होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी मोठी ऑफर मिळाल्याने आर्थिक लाभ संभवतो. 


मीन (Pisces)


आजच्या दिवशी यंत्रसामग्रीच्या वापरात निष्काळजीपणा करू नये. तुमच्या विरोधात कट रचला जाण्याची शक्यता असून कामाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगावी लागणार आहे.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )