मुंबई : कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल, याची माहिती घेऊया. जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य.


मेष


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजच्या दिवशी नोकरीत परिवर्तनाचे योग आहेत. शिवाय जुनी समस्या दूर होईल. आयुष्यात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा.


वृषभ


आजच्या दिवशी तुमच्या जीवनशैलीत सुधारणा होईल. उच्च पदावरील व्यक्तीचं सहकार्य लाभेल. तसंच कामाचा ताण वाढू शकतो.


मिथुन


या राशीच्या व्यक्तींना व्यवसायात शर्यत वाढू शकते. यामुळे आर्थिक लाभ होऊ शकतात. धैर्य ठेवा आणि शांत रहा.


कर्क


या राशीच्या लोकांनी आजच्या दिवशी करिअरचा ताण घेऊ नये. खर्च वाढण्याची शक्यता आहे. पूर्व योजना तयार करून काम करा.


सिंह


या राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभाची शक्यता आहे. फायदेशीर प्रवासाचा योग आहे. आजच्या दिवशी अनावश्यक कौटुंबिक वाद टाळा.


कन्या


आजच्या दिवशी रोजगार मिळणे सोपं होईल. जीवनात प्रेम आणि संबंध चांगले राहू शकतील. शिवाय आरोग्याची चिंता वाढू शकते.


तूळ


तूळ लोकांचा कौटुंबिक समस्या सुटण्याची शक्यता आहे. समाजात मान-सन्मान वाढू शकतो. जुनं धन मिळू शकतात.


वृश्चिक


आपत्यांच्या समस्या वाढू शकतात. मानसिक तणाव वाढू शकतो. स्वत: वर विश्वास ठेवा.


धनु


या राशीच्या व्यक्तींच्या वैवाहिक समस्या कमी होतील. चुकीच्या निर्णयामुळे काम बिघडू शकतं. वडीलधाऱ्यांच्या मदतीमुळे फायदा होईल.


मकर


मकर राशीच्या विवाहाची समस्या दूर होईल. आर्थिक बाजू चांगली राहण्यास मदत होणार आहे. घाई-घाईने कामं करू नका.


कुंभ


कुंभ राशीची आर्थिक बाजू आधीच उत्तम राहणार आहे. कौटुंबिक जीवनातील अडचणी दूर होतील. धार्मिक कार्यात व्यस्त राहाल.


मीन


नोकरी व्यवसायात विचार करून बदल करा. आजच्या दिवशी कुटुंबात वाद होऊ देऊ नका. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या.