Horoscope 5 August 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


आजच्या दिवशी आराम करा अन्यथा समस्या उद्धभू शकतात. सहकाऱ्यांची मदत मिळेल. नवीन लोकांशी ओळख होईल. 


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी अविवाहितांच्या प्रेमसंबंधांमध्ये तणाव राहील. नोकरी, व्यवसायात लाभ होईल. दिवस चांगला आहे.


मिथुन (Gemini)


आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी लक्ष विचलीत होऊ शकते.  जोडीदारासोबत दिवस चांगला जाईल. 


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी ऑफिसमध्ये अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. दिवसाची सुरुवात ठिक राहणार नाही. इच्छा नसतानाही पैसे खर्च करावे लागतील. 


सिंह (Leo)


आजच्या दिवशी पैशांच्या स्थितीत सुधारणा होईल. चांगल्या लोकांच्या संगतीमुळे फायदा होईल. 


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी प्रगतीसाठी अधिक मेहनत करावी लागेल. ऑफिसमध्ये काही लोक गुप्तपणे तुमची मदत करतील.


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्तींनी भावनेच्या भरात कोणतेही निर्णय घेऊ नये. व्यवसायात नवीन योजना आखू शकता.


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी गुंतवणूकीसाठी योजना आखू शकता. अचानक होणारी भेट फायद्याची ठरु शकते. 


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी कामासंबंधी अडचणी कमी होऊ शकतात. विचाराधीन असलेली कामं पूर्ण होतील.


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी आखलेल्या योजना फायदेशीर ठरु शकतात. वादाचे प्रसंग येऊ शकतात. मानसिक समस्या जाणवू शकतात.


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी तब्येतीच्या बाबतीत सावध राहण्याची गरज आहे. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे.


मीन (Pisces)


आजच्या दिवशी नोकरीत बढतीची शक्यता आहे. नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )