Horoscope 5 June 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


आजच्या दिवशी आपली प्रतिमा सुधारण्याची दाट शक्यता आहे. रखडलेली सर्व काम आज पूर्ण होतील.


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी नवीन व्यवहार करण्याचा योग आहे. अविवाहित लोकांसाठी आजचा दिवस खास आहे. 


मिथुन (Gemini)


आजच्या दिवशी पैशांची थोडी चिंता जाणवेल पण त्याची काही गरज नाही. कामात थोडं तणावाच वातावरण असेल.  


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी सर्व काम पूर्ण करून आरोग्याकडे लक्ष द्याल. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळेल.


सिंह (Leo)


आजच्या दिवशी अचानक धन लाभ झाल्यामुळे फायदा होईल. विचार केलेल्या कामांचा आज सपाटाच लावाल.


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी व्यवसायात थोडा कमी फायदा होईल पण नाराज होऊ नका. कुटुंबाकडून सपोर्ट मिळेल त्यामुळे कामात भरघोस यश मिळेल.


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्तींनी आज एक आनंदवार्ता कानी येऊन मूड बदलेल. जवळच्या व्यक्तीकडून दुखावले जाण्याची शक्यता आहे.


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी काही महत्वाचे निर्णय हे तुम्हाला विचारूनच घेतले जातील. आजचा दिवस एकांतात घालवण महत्वाच ठरणार आहे. 


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी बऱ्याच कालावधीनंतर आवडीच्या व्यक्तींसमवेत वेळ व्यतीत करण्याची संधी मिळेल. आज खऱ्या मित्रांची मदत होणार आहे.


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी अनेक प्रकारचे विचार मनात येत राहतील. व्यवसायात नवीन काम सुरु होऊ शकते.


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी रखडलेली कामं पूर्ण होतील. जबाबदारी वाढू शकते. पैशांसंबंधी टेन्शन कमी होईल.


मीन (Pisces)


आजच्या दिवशी बोलताना विचार करुन बोला. जोडीदारासोबत संबंध अधिक दृढ होतील. विचार करत असलेल्या कामाची सुरुवात करा.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )