Horoscope 8 June 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


आजच्या दिवशी नवीन काम सुरु करण्याचा प्रयत्न करु शकता. गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. 


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी करियरमध्ये पुढे जाण्यासाठी चांगली संधी मिळू शकते. कुटुंबातील व्यक्तींशी असलेल्या संबंधांमध्ये सुधारणा होईल. 


मिथुन (Gemini)


आजच्या दिवशी पती-पत्नीमधील गैरसमज दूर होतील. हवामान बदलामुळे त्रास होऊ शकतो. कोणंतंही महत्त्वाचं पाऊल उचलण्याआधी विचार करा.


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी कोणतंही काम पूर्ण करण्यासाठी अपेक्षित मदत मिळेल. नोकरदारवर्गाला नवीन काम मिळण्याची शक्यता आहे. 


सिंह (Leo)


आजच्या दिवशी व्यवसायात रखडलेले पैसे मिळू शकतात. एखाद्या गोष्टीबाबत मानत संभ्रम राहील. 


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी पैशांच्या बाबतीत मोठा निर्णय स्वत: घेऊ नका. तुमच्या मनातील गोष्टी योग्यप्रकारे मांडता येणार नाहीत.


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्तींनी वायफळ खर्च करु नये. एखादी जवळची व्यक्ती तुमचा चुकीचा फायदा घेऊ शकते.


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी कोणत्याही कामात फेरबदल झाल्यास फायदा तुम्हालाच होणार आहे. तुम्ही केलेल्या कामातून धनलाभ होईल.


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी कार्यक्षेत्रात कोणता नवा विचार करु नका. नोकरीत पदोन्नतीची संधी आहे. कामकाज वाढू शकते.


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी पैशांच्या स्थितीत सुधार आणण्याची संधी मिळेल. कोणत्या आवडच्या व्यक्तीच्या संपर्कात याल.


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी तुम्हाला एक नवी सुरूवात करण्याची संधी मिळेल. व्यवसायात फायदा होण्याचे योग आहेत. 


मीन (Pisces)


आजच्या दिवशी पैशांसाठी छोटा प्रवास करावा लागेल. तुमच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतील.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )