Horoscope 9 April 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आजचा दिवस हिंदू नववर्षाचा आहे. म्हणजेच आजचा दिवस गुढीपाडव्याचा. पाहूया नववर्षाच्या दिवशी तुमचं भविष्य कसं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


आजच्या दिवशी तुम्हाला पगारवाढ, पदोन्नती मिळेल. रखडलेले काम पूर्ण होईल. हिंदू नववर्ष तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. 


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी  वरिष्ठांवर प्रभाव पाडण्यात यशस्वी ठराल. नव्या नोकरीविषयी माहिती मिळेल. तुमच्या राशीत गुरुचे भ्रमण होणार आहे, यामुळे तुम्हाला कामात यश मिळेल. 


मिथुन (Gemini)


आजच्या दिवशी अचानक एखादं खास काम करावं लागू शकतं. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात मधुरता वाढेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल.


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी बऱ्याच अंशी काही कामांमध्ये व्यग्र असाल. नवीन वर्षात तुम्हाला थोडा आराम मिळेल आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल.


सिंह (Leo)


आजच्या दिवशी नवं प्रेमप्रकरणही सुरु होण्याची चिन्हं आहेत. हे नवीन वर्ष तुमच्या राशीसाठी संमिश्र परिणाम देणारे असणार आहे.


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी जमीन किंवा नव्या घर खरेदीचा विचार करु शकता.  शनी देवाच्या कृपेने तुम्हाला तुमच्या नोकरीत सकारात्मक परिणाम दिसून येतील. 


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्तींना एखादी शुभवार्ता कळेल. विचाराधीन कामं पूर्ण केल्यास फायद्याचं ठरेल. 


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी नव्या व्यक्तींना भेटण्याची संधी मिळेल. पुढे जाण्यासाठी काही संधी मिळण्याची शक्यता आहे.


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळेल आणि तुम्ही शेअर बाजार, लॉटरीमध्ये ही नफा मिळवू शकता. तुम्ही नोकरी किंवा व्यवसायात बदलासाठी प्रयत्न करत असाल, तर यश मिळेल.


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्नही तुम्ही कराल. पगारात वाढ होऊ शकते. कर्ज चुकते करता येऊ शकते.


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी पैशांचे कोणतेतरी जुने प्रकरण मार्गी लावण्याचा प्रयत्न कराल. जोडीदारासोबत सुरू असलेला तणाव मिटण्याची शक्यता आहे.


मीन (Pisces)


आजच्या दिवशी व्यवसायाशी संबंधित निर्णय तुमच्या बाजूने असतील. नोकरीमध्ये वरिष्ठ तुमच्या कामावर खुश असतील.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )