Horoscope 9 March 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


आजच्या महत्वाची आर्थिक कामे आपण पुढे ढकलावीत. पैशाचा प्रश्न सुट शकतो. कोणत्याही मतभेद लवकरच सोडवण्याचा प्रयत्न करा.


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी मित्र आपल्याला समस्यांमधून मदत करतील. कोणत्याही मतभेद लवकरच सोडवण्याचा प्रयत्न करा.


मिथुन ( Gemini )


आजच्या दिवशी अचानक सामाजिक क्षेत्रातून सहलीचे बेत आखले जातील. आपण काही नवीन काम करण्याचा विचार करत असाल तर आपल्यासमोर आणखी काही काम मिळू शकेल.


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी प्रतिस्पर्ध्याची चाल पाहूनच पुढे वाटचाल करावी. नोकरीत जबाबदारीची कामे करताना योग्य ती दक्षता घ्या. 


सिंह (Leo)


आजच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये तुमची चिंता कमी होईल. कामाच्या व्यापासोबतच कुटुंबाच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील. 


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी आरोग्याची काळजी घ्या. एखाद्या जुन्या मित्राची भेट घडेल. करिअरमध्ये सुधारणा होतील.


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्तींना अडकलेले पैसे मिळणार आहेत. धार्मिक कामात सहभागी व्हाल. आर्थिक अडचणी दूर जातील. 


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी काही अडचणी येतील. नोकरी आणि व्यवसायात फायदा होणार आहे.  


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी काही अपूर्ण कामं मार्गी लागतील. निर्णय घेताना मोठ्यांची मतं विचारात घ्या. 


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी पैशाच्या बाबतीत सगळे प्रश्न सुटतील. जोडीदाराच्या शोधात असाल तर आज महत्वाचे निर्णय घेऊ शकता.


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी नोकरी, व्यवसाय अन्यथा घरगुती कामांमध्ये देखील थोडी अधिक मेहनत घ्यावी लागेल. काही महत्वाची काम आज योजली असतील तर ती नक्की करा.   


मीन (Pisces)


आजच्या दिवशी नवीन जबाबदारी मिळू शकते. आर्थिक स्थिती आज बदल होण्याचा योग आहे. जोडीदारासोबत अधिक वेळ घालवाल.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )