मुंबई : दत्तगुरू हे अनेकांचे श्रद्धास्थान. त्यामुळेच दत्त जयंती नेहमीच मोठ्या उत्साहात साजरी केली जात असते. गेली कित्येक वर्षे परंपरेने दत्त जयंती साजरी करणे सुरूच आहे. आजही (रविवार, 3 डिसेंबर) ती साजरी होत आहे. म्हणूनच दत्तगुरूंबाबत ही थोडक्यात माहिती...


भक्तांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वसामान्य माणसाच्या भक्तीचा केंद्रबिंदू म्हणजे दत्त. स्वधर्म, संस्कृती आणि जगण्यातील संघर्ष, व्यथा, वेदना आदींमुळे व्यक्ती जेव्हा हैराण होतात तेव्हा दत्तगुरू मदतिला येतात अशी अनेकांची भावना आहे.  अत्रि ऋषी आणि त्यांची पत्नी अनसूया यांच्या पोटी जन्माला आलेले रत्न म्हणजे दत्त ही देवता, असा उल्लेख पुराणांमध्ये आढळतो. संपूर्ण एकच असलेल्या मानवी शरीराला तिन तोंडे अशी दत्तमूर्तीची रचना असते. त्या त्रिमूर्तीत एक दत्ताची तर, दुसऱ्या दोन्हीपैकी एक दुर्वास व दुसऱा सोम अशा दोन्ही भावांचाही समावेश असल्याचा उल्लेख पुराणात आहे. दत्ताचा उल्लेख त्याचे साधक, परंपरेने गुरुदेव असा करतात.


दत्ताच्या त्रिमूर्तीचा अर्थ काय?


दत्तमुर्तीच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेबद्धल अनेकदा कुतूहल व्यक्त होते. मात्र, हिंदू पौराणिक साहित्याचा आधार घ्यायचा तर, दत्त, सोम आणि दुर्वास अशा तिघांची एकत्र मूर्ती म्हणजे हा विष्णू, ब्रह्मा व शिव यांचा अवतार असल्याचा उल्लेख सापडतो. पूर्व काळात विष्णू म्हणून प्रचलित असलेले दत्त उत्तर काळात उत्तर काळात ब्रह्मा, विष्णु आणि महेश अशा तिन्ही देवांचे अंशरूप आहे.


कशी असते दत्तमुर्ती?


त्रीमुखी असलेली दत्त देवता ही प्रामुख्याने औदुंबराच्या वृक्षाखाली यज्ञकुंडासमोर अथवा अग्नीसमोर बसलेली दिसते. गळ्यात रुद्राक्षमाळा, अंगावर भस्माचे पट्टे, समोर चार कुत्री, मागे गाय असा परिसर हमखास दिसतोच. दत्तमुर्तीसोतब असणारी चार कुत्र्यांचाही विशेष अर्थ असतो. ही चार कुत्री हे वेद आणि शंकराचे भैरव मानले जातात. तर, स्वत: दत्त वाढेलेल्या दाढीत दिगंबर आवस्थेतही दिसतात. रुद्राक्ष, अंगावर भस्म यांवरून तो स्मशानात राहणार्‍या शिवाचे ध्यान करत असल्याचे पटकण लक्षात येते.


संत साहित्यातही महत्त्वपूर्ण उल्लेख


संत एकनाथ, संत तुकाराम आदी संतांच्या गवळण आणि अभंगातूनही दत्त महात्त्म्याचा उल्लेख आढळतो.