Dhantrayodshi Shopping :  यंदा धनत्रयोदशीचा (Dhanteras 2023) 10 नोव्हेंबरला आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी परंपरेने लक्ष्मी, कुबेर देव आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी लोकं आपली घरे स्वच्छ करतात आणि छान सजवतात. तसेच धन आणि संपत्तीच्या वाढीसाठी या दिवशी घरांमध्ये विशेष पूजा (dhanvantari puja) केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी लोक अनेक वस्तू तसेच सोनं चांदी देखील खरेदी करतात. दिवाळीच्या (Diwali 2023) दोन दिवस आधी हा सण साजरा केला जातो. या दिवशी मुल्यवान वस्तू खरेदी केल्याने वर्षभर धनप्राप्ती होते, अशी मान्यता आहे. दिवशी सोने-चांदी, मालमत्ता, वाहन याशिवाय काही खास वस्तूंची खरेदी करावी, त्यामुळे तुम्हाला वर्षभर पैशांची चणचण भासणार नाही. 


पुजेचा शुभ मुहूर्त कधी?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुबेर देव माता लक्ष्मी आणि आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी यांची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त 10 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 5.47 ते 7.43 पर्यंत आहे. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. तर धनत्रयोदशीला खरेदीसाठी शुभ मुहूर्त 10 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 12.35 ते दुसऱ्या दिवशी 11 नोव्हेंबर रोजी रात्री 01.57 पर्यंत आहे.  


कोणत्या वस्तू खरेदी कराव्या...


धन्वंतरी पुजेच्या काळात कोणतीही वस्तू खरेदी करावी, यामध्ये झाडू देखील खरेदी करावा लागतो. त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा वर्षभर राहते. सोने-चांदी वस्तू, एखादं भांडी, कुबेर यंत्र, पितळी हत्ती आणि झाडू या पाच वस्तू खरेदी कराव्या.


आणखी वाचा - Dhanteras 2023 : धनत्रयोदशीला 50 वर्षानंतर दुर्मिळ योग! जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पुजाविधी


महागडी वस्तू खरेदी करता येत नसेल, तर तुम्ही गोमती चक्र देखील विकत घेऊ शकता.  त्यामुळे  देवी लक्ष्मीचा निवास करण्यास मदत होते, असं देखील म्हटलं जातं. या दिवशी अंगणात यमाच्या नावाने दिवे लावले जातात. त्यामुळे घरात मृत्यूची भीती नाहीशी होते, असा समज आहे. यम दीपाची शुभ वेळ संध्याकाळी 05.30 ते 06.49 पर्यंत आहे.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)