मुंबई : दिव्यांचा उत्सव दिवाळी काही दिवसांवर आली आहे. दिवाळीला लक्ष्मीचं पूजन करून धन आणि सुख-समृद्धीची प्रार्थना केली जाते. यासोबतच या दिवशी भगवान राम लंकेवर विजय मिळवून अयोध्या नगरीत परत आले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्या आनंदातही दिवाळी साजरी केली जाते. तेव्हापासूनच दिवाळीची सुरूवात झाल्याचे मानले जाते. दिवाळीत दिव्यांची रोषणाई करण्यासोबतच आज फटाक्यांची आतषबाजीही केली जाते. पण फटाके फोडणे पर्यावरणासाठी आणि आरोग्यासाठी हानिकारक आहे. पण लोकं त्याचा विचार करताना दिसत नाही. पण आम्ही अशा काही टीप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही ही दिवाळी अधिक आनंददायी करू शकता.


सिंथेटीक कपडे टाळा -


दिवाळीत लहान मुलं आणि मोठेही फटाके फोडण्याचा आनंद घेतात. पण फटाके उडवायचे असेल तर कॉटनचेच कपडे परिधान करा. सिंथेटीक कपडे टाळा. 


मुलांना समजवा -


फटाके फोडणे हे तसे खूप धोकादायकही असतं. फटाके फोडताना मुलांची काळजी घ्या. फटाके फोडताना शक्यतो मुलांना फटाक्यांपासून दूर ठेवा. मोठ्यांनी फटाके फोडतांना लहान मुलांना काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन करा. त्यांना समजावून सांगा.


जागेची निवड -


फटाके फोडण्यासाठी योग्य जागेची निवड करणेही तितकंच महत्वाचं आहे. फटाके फोडण्यासाठी मोकळ्या जागेत जावे. दाट किंवा अडचणीच्या जागेत फटाके फोडल्यास आग लागण्याची शक्यता असते. त्यामुळे फटाके फोडण्यासाठी मोकळ्या जागेत जावे.


फटाक्यांचा कचरा नष्ट करणे -


फोडलेले फटाके काळजीपूर्वक नष्ट करावे. ते तुम्ही पाण्याने भरलेल्या बकेटीत टाकू शकता. किंवा वाळूने भरलेल्या बकेटीत घाला. 


मेणबत्ती आणि दीपक -


मेणबत्ती किंवा दिव्यांनीच घरात रोषणाई करा. दिवे लावताना याची काळजी घ्यावी की, आजबाजूला पडदे किंवा ज्वलनशील पदार्थ असू नये. 


पाळीव प्राण्यांची काळजी घ्या -


दिवाळीत घरातील सर्वच पाळीव प्राण्यांची विशेष काळजी घ्यावी. त्यांना कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये यासाठी त्यांना सुरक्षीत ठेवणे महत्वाचे आहे. लोक आपल्या आनंदाच्या भरात पाळीव प्राण्यांची काळजी घेणे विसरतात. त्यामुळे त्यांना जखम होऊ शकते. 


वयोवॄद्धांची काळजी -


दिवाळी हा सुख-समॄद्धी आणि आनंदाचा उत्सव आहे. हा साजरा करताना काळजी घ्या की, अतिउत्साहात कुणाला नुकसान पोहचू नये. घरातील वयोवॄद्धांना फटाक्यांच्या आवाजाने त्रास होत असेल तर त्यांना जपा.