Diwali Date: गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) संपून आता अवघे काही दिवस उलटले आहेत. तोच पंधरवड्यानंतर नवरात्रोत्सवाची सुरुवात होत आहे. तिथं नवरात्र पूर्णत्वास जात नाही तोच यंदाच्या वर्षी दिवाळी कधी आहे, हे जाणून घेण्यासाठी अनेकांनी पंचांग हाती घेतलं आहे. (diwali holidays) दिवाळीच्या सुट्ट्या कधी मिळणार, सुट्ट्या कशा घ्यायच्या, फिरायला आणि नातेवाईकांना भेटी द्यायला कधी जायचं यासाठीचे बेत आतापासूनच आखण्यास सुरुवात करण्यात आली आहे. (Lord Ram) प्रभू राम वनवास करुन आणि लंकाधीश रावणावर विजय मिळवून परतले तेव्हा अयोध्येमध्ये मंगलपर्व साजरा करण्यात आलं. हीच ती दिवाळी. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवी लक्ष्मी (Goddess) आणि गणपती (Lord Ganesh) या देवतांची पूजा दिवाळीदरम्यान केली जाते. वसुबारसपासून या सणाची सुरुवात होते. काही भागांमध्ये दिवाळी धनत्रयोदशीपासून सुरु होते. यंदाच्या वर्षीही या सणाची अशीच उत्सुकता पाहायला मिळेल यात शंका नाही. 


2022 म्हणजेच यावर्षी दिवाळी 24 ऑक्टोबर  (24 October) या दिवशी आहे. चला... तारीख तर कळली, आता जाणून घेऊया दिवाळीतील काही शुभमुहूर्तांविषयी (Diwali Shubh Muhurat). 


वाचा : Navratri : नवरात्री आधी जाणून घ्या, काय आहे अखंड ज्योतीशी संबंधित श्रद्धा


यंदाच्या वर्षी अमावस्या 24 आणि 25 ऑक्टोबर अशा दोन दिवसांमध्ये विभागून आली आहे. अमावस्या 25 ऑक्टोबरला प्रदोष काळापूर्वीच संपणार आहे. दरम्यान, लक्ष्मीपूजनासाठी 24 तारखेला सायंकाळी 6 वाजून 8 मिनिटांपासून रात्री 8 वाजून 38 मिनिटांपर्यंतचा शुभ काळ असणार आहे. त्याचवेळी घरातील लक्ष्मीची पूजा (Laxmipujan) करा. 


कशी करावी पूजा? 
दिवाळीच्या दिवशी सर्वच देवतांची पूजा मनोभावे करा. त्यातही लक्ष्मी आणि ईष्ठदेवता गणपतीची पूजा प्राधान्यानं करा. यासाठी सर्वप्रथम या मंगलपर्वाआधी घर स्वच्छ करा. घरातील धुळीसोबतच नकारात्मकताही बाहेर टाकून द्या. पूजा करण्यासाठी घरात लक्ष्मी आणि गणपतीची मूर्ती आणून त्याची प्रतिष्ठापना करा. सुरेख रांगोळी काढा. मूर्तीची पूजा करा, तिथे दिवा लावा. यानंतर पाणी, अक्षता, गुळ, फळं इत्यादी पदार्थ अर्पण करा. कुटुंबातील सर्वांनी एकत्र येऊन पूजाअर्चा करा. घरात मंगलमय वातावरण नांदेल यासाठी काही मंत्रोच्चारण सुरु ठेवा. कलह टाळा. 


(वरील माहिली धार्मिक मान्यतांवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)