Diwali 2022 : दिवाळीसाठी कपड्यांची खरेदी करत आहात?, लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी `या` रंगाचे कपडे घाला
Horoscope : जर तुम्ही तुमच्या राशीनुसार दिवाळीसाठी योग्य रंगांची निवड केली तर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या जीवनात सदैव राहील.
Diwali 2022 Colours To Wear: दिवाळीचा (Diwali 2022) सण म्हणजे प्रकाशमय, आनंदाचा उत्साह...हिंदू धर्मामध्ये सर्वात मोठा उत्साह...संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात येतो. अगदी जगभरातही मोठ्या थाटामाटात हा उत्साह साजरा केला जातो. दिवाळी म्हटलं की फराळ, रांगोळी, कंदील आणि शॉपिंग...जर तुमची अजून शॉपिंग (Diwali Shopping) झाली नसेल तर आज आम्ही तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसन्न (Lakshmi) करण्यासाठी ज्योतिष्यशास्त्रानुसार (Astrology) कुठल्या राशीने कुठले कपडे घ्यालावे ते सांगणार आहोत.
दिवाळीत महिलांना वेगवेगळ्या रंगांचे कपडे घालायला आवडतात. साधारणपणे लोकांना या दिवशी असे कपडे घालायला आवडतात जे सणाशी जुळणारे दिसतात. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी विशिष्ट रंगांचे कपडे तुमच्या जीवनात आनंद आणू शकतात.असं मानलं जातं की दिवाळीच्या दिवशी आणि लक्ष्मीपूजनाच्या वेळी राशीनुसार कपडे निवडले तर ते जीवनात आनंद आणू शकतात. दिवाळीत तुमच्या राशीसाठी कोणता रंग सर्वोत्तम असू शकतो, जेणेकरून घरात माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव राहील, हे जाणून घेऊयात...(Diwali 2022 Colours To Wear Astrology nmp)
मेष (Aries)
मंगळ हा मेष राशीचा स्वामी मानला जातो आणि मंगळाला लाल रंग नेहमीच आकर्षित करतो. या दिवाळीत तुम्ही लाल किंवा तत्सम रंग जसे केशरी, मरून इत्यादी रंगाचे कपडे निवडले तर ते तुमच्या आयुष्यात कायमचा आनंद आणू शकेल. हा रंगही माता लक्ष्मीला तुमच्या घराकडे आकर्षित करेल, त्यामुळे पूजेच्या वेळीही लाल रंगाची साडी घाला.
वृषभ (Taurus)
वृषभ राशीसाठी निळा रंग सर्वात शुभ मानला जातो. दिवाळीत कपड्यांचे योग्य रंग निवडल्यास तुमच्या आयुष्यात शुभ गोष्टी घडतील. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या वेळी त्याच रंगाची साडी घाला.
मिथुन (Gemini)
मिथुन राशीचे लोक स्वभावाने चैतन्यशील असतात आणि केशरी रंग नेहमीच त्यांचं व्यक्तिमत्व प्रतिबिंबित करतो. त्यामुळे आयुष्य आनंदी ठेवायचे असेल तर दिवाळी पूजेत केशरी रंग निवडा.
कर्क (Cancer)
कर्क राशीच्या लोकांनी दिवाळीच्या पूजेदरम्यान हिरव्या रंगाचे कपडे परिधान केले तर त्यांच्या आयुष्यात कधीही तणावाची परिस्थिती उद्भवणार नाही आणि त्यांना आर्थिक लाभही होतो. हिरवा रंग देखील बुध ग्रहाचा कारक मानला जातो. त्यामुळे या दिवशी हिरवा रंग धारण केल्याने गणपतीही प्रसन्न होतो.
सिंह (Leo)
सूर्य हा सिंह राशीचा स्वामी मानला जातो. असं मानलं जातं की सिंह राशीच्या महिलांनी दिवाळीच्या दिवशी तपकिरी रंगाचे कपडे परिधान केले तर त्यांच्या जीवनात सदैव सुख-समृद्धी राहते आणि देवी लक्ष्मीची कृपा होते.
कन्या (Virgo)
कन्या राशीच्या लोकांनी दिवाळीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्यास जीवनात सुख-समृद्धी येण्यास मदत होते. पिवळा रंग सकारात्मक ऊर्जा स्वतःकडे आकर्षित करतो.
तुला (Libra)
तूळ राशीचा शासक ग्रह शुक्र मानला जातो. शुक्र हा सौंदर्याचा ग्रह आहे असं मानलं जातं. त्यामुळे दिवाळीच्या दिवशी पांढरे, चांदीचे किंवा राखाडी रंगाचे कपडे परिधान केले तर ते तुमच्या जीवनात समृद्धीचे कारक ठरेल.
वृश्चिक (Scorpio)
वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ देखील मानला जातो, त्यामुळे वृश्चिक राशीच्या महिलांनी दिवाळीच्या रात्री लक्ष्मीपूजनाच्या वेळी लाल रंगाची साडी नेसल्यास त्यांचे जीवन आनंदाने भरून जाईल.
धनु (Sagittarius)
जर धनु राशीच्या महिलांनी दिवाळीच्या पूजेत जांभळ्या रंगाची साडी नेसली तर तुमच्या जीवनात आनंद येण्यास मदत होईल आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहील.
मकर (Capricorn)
जर मकर राशीच्या लोकांनी दिवाळीच्या दिवशी हलके गुलाबी किंवा फिकट जांभळे कपडे घातले तर ते त्यांच्या कुटुंबात आनंद आणण्यास मदत करेल.
कुंभ (Aquarius)
शनि हा कुंभ राशीचा अधिपती ग्रह मानला जातो. त्यामुळे दिवाळीच्या दिवशी जर तुम्ही हलके निळे किंवा राखाडी रंगाचे कपडे परिधान केलेत तर तुमच्या जीवनात आनंद कायम राहील.
मीन (Pisces)
मीन राशीसाठी गुलाबी हा सर्वात शुभ रंग आहे. जर तुम्ही दिवाळीच्या दिवशी गुलाबी रंगाची साडी नेसून लक्ष्मीपूजन केले तर ते तुमच्यासाठी समृद्धीचे दरवाजे उघडण्यास मदत करेल.
जर तुम्ही तुमच्या राशीनुसार दिवाळीसाठी योग्य रंगांची निवड केली तर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या जीवनात सदैव राहील.