Diwali 2022 : दिवाळी  सुरू झाली आहे. भारतातील अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी. केवळ भारतातच नाही तर दिवाळी आता ग्लोबल ( Global festival diwali)  सण देखील झाला आहे. दिवाळीचा सण पाच दिवसांचा असतो. दिवसाचं वेगळं महत्त्व आहे. अशात धनत्रयोदशीचा ( Dhanteras ) दिवस म्हणजे माता लक्ष्मीचा आशीर्वाद ( Mata Laxmi Pujan) मिळवण्यासाठीचा अत्यंत खास आणि महत्त्वाचा दिवस. म्हणूनच हिंदू धर्माप्रमाणे या दिवसांत काही गोष्टी या टाळण्यास  सांगितल्या जातात. दिवाळीमध्ये या गोष्टी तुम्ही केल्यात तर दारिद्र्य येतं असं बोललं जातं. या नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत?  जाणून घेऊया 


केशवपन करू नका : 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदू धर्मात केसांना त्या माणसाची पुंजी मानली जाते. महाभारतातील अनुशासन ( Mahabharat Anushasan Parva) पर्वात म्हंटलं आहे की अशा शुभ तिथीवर केस कपणाऱ्या व्यक्तीची ज्ञान, बुद्धी आणि धनाची हानी होते. या दिवसात केस कापल्याने ( Hair Cutting) लक्ष्मी माता रुसते आणि निघून जाते.  


सफेद रंगाच्या वस्तू 


हिंदू शात्राप्रमाणे माता लक्ष्मीला सफेद रंगाच्या गोष्टी ( White colour ) आवडतात. म्हणून पाच दिवसांमध्ये लक्ष्मीची पाच वेगवेगळ्या गोष्टींचा प्रसाद बनवला जातो आणि नेवेद्य दाखवला जातो. असं मानतात या पाच दिवसांत कोणत्याही सफेद वस्तूंचं दान करू नये. यामध्ये दूध, साखर, पीठ, सफेद रंगांची मिठाई, तांदूळ यांचा समावेश  होऊ शकतो. असं केल्याने दारिद्र्य येऊ शकतं, असं बोललं जातं.


घर रिकामं ठेवू नका


असं म्हणतात की भक्तांवर कृपा करण्यासाठी माता लक्ष्मी पृथ्वीवर येते. खासकरून धनत्रयोदशी ते भाऊबीजेपर्यंत लक्ष्मी मातेची खास पूजा अर्चना केली जाते. शास्त्रात म्हंटलं आहे की या दिवसांमध्ये घर रिकामं ( Dont keep home empty ) ठेवू नका. तुम्ही घराला टाळं ठोकून बाहेर निघून गेलात तर लक्ष्मी रुसून निघून जाते आणि दारिद्र्य येतं. 


दान दक्षिणेला विशेष महत्त्व


हिंदू धर्मात दान किंवा दक्षिणा याला विशेष महत्त्व आहे. अशात विशेष तिथीला दान केल्यास त्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होतं. असं म्हणतात धनत्रयोदशी ते भाऊबीजेपर्यंत आपल्या घरी कुणी गोरगरीब किंवा भिकारी आला तर त्याला रिकाम्या हाताने पाठवू नका. असं केल्यास तुम्ही कंगाल होऊ शकतात.  


अशी कोणतीही कामं करू नका


दिवाळीचा पाच दिवसांचा सण असतो. यामध्ये लक्ष्मी नाराज होऊन निघून जाईल अशी कोणतीही कामं करू नका. या पाच दिवसात कुणासोबत पैशांची लेन-देन करू नका. असं केल्यासही तुम्ही कंगाल होऊ शकतात.


( Disclaimer: वरील बातमीमधून आमचा कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न नाही. वरील माहिती सर्वसान्य ज्ञानावर आधारित आहे. सर्वसामान्य आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)