Easy Rangoli Videos: लक्ष्मीच्या पावलांची सोपी रांगोळी, दारात काढा झटपट रांगोळी
Diwali 2022 : दिवाळी हा हिंदू धर्माचा सर्वात मोठा सण... मग हा सण रांगोळीशिवाय पूर्ण होऊ शकतं नाही. जर तुम्हाला रांगोळी येतं नसेल तर आज आम्ही तुम्हाला साधी- सोपी रांगोळी डिझायन्स दाखविणार आहोत.
Lakshmi Pujan Rangoli Videos : दिवाळी म्हणजे दिव्यांची आरास, दिवाळी म्हटलं की मनसोक्त फराळ, दिवाळी म्हटलं की फटाके...त्यासोबत दारासमोर रांगोळी ही घराची शोभा वाढते. लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी घराची सजावट केली जाते. लाईटच्या माळा, कंदीलने घराची शोभा काही औरच वाटते. भारतीय संस्कृतीत घराच्या दारात आणि अंगणात रांगोळी काढायची जुनी परंपरा आहे. दिवाळी हा हिंदू धर्माचा सर्वात मोठा सण... मग हा सण रांगोळीशिवाय पूर्ण होऊ शकतं नाही. जर तुम्हाला रांगोळी येतं नसेल तर आज आम्ही तुम्हाला साधी- सोपी रांगोळी डिझायन्स दाखविणार आहोत. (Diwali 2022 Lakshmi Pujan Rangoli lakshmi paul rangoli easy and innovative)
भारतात सणामध्ये दारा लक्ष्मी पावलांची रांगोळीला विशेष महत्त्वं आहे. ज्योतिषशास्त्रानुसार दारात लक्ष्मी पावलांची रांगोली शुभ मानली जाते. या व्हिडीओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला लक्ष्मीच्या पावलांची सोपी रांगोळी दाखविणार आहोत.
रांगोळी काढण्यामागे प्राचीन परंपरा असून त्याला धार्मिक आणि ऐतिहासिक कारणं आहेत. अनेक जण दिवाळीत फुलांची रांगोळी काढतात.
रांगोळीची परंपरा मोहेंजोदडो आणि हडप्पा संस्कृतीपासून सुरू असल्याचा उल्लेख लेखनात सापडतो.
दिवाळी म्हणजे श्री राम यांनी रावणाचा वध केल्यानंतर श्री राम प्रभू आणि माता सीता अयोध्येत परले होते. म्हणून दिवाळीचा सण मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येतो.
पूर्वी धान्य आणि पिठाचा वापर करुन रांगोळी बनवली जायची. मात्र आजकाल बाजारात विविध रांगोळी काढण्यासाठी रंग मिळातात. शिवाय झटपट रांगोळीसाठी विविध उपकरणे देखील बाजारात उपलब्ध आहेत.
आज जग कितीही बदलं असलं आणि आपण मॉडन झालो असलो तरी आजही दारात रांगोळी काढली जाते.
गावागावात आजही घराच्या उंबरठ्यावर स्वस्तिक, लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढली जाते.
रांगोळी हा शब्द प्राचीन संस्कृतमधून आला आहे. याचा अर्थ रंगांद्वारे भावना व्यक्त करणे. भारतात काही ठिकाणी रांगोळीला 'अल्पना' या नावानेही ओळखलं जातं. त्यामुळे यंदा दिवाळी तुम्हीही मस्त साधी सोप्या पद्धतीने झटपट रांगोळी काढा.