Diwali 2022: दिवाळीनिमित्त घराला रंगरंगोटी करण्याचा विचार करत आहात, मग जाणून घ्या `या` गोष्टी
Vastu Tips : त्यामुळे तुमचं घरात सुख-समृद्धी नांदेल. वास्तूनुसार तुमच्या घराच्या भिंतींना रंग दिल्यास तुमचं कुटुंबाचं नशिब उघले असं वास्तूशास्त्रात म्हटलं जातं. शिवाय घराची रंगरंगोटी (Home Colour) करताना वास्तूची काळजी घेतल्यास तुमच्या घरात सकारात्मक उर्जा निर्माण होते.
Diwali Vastu Tips for Home Colour : गणपती-दसरा आणि आता दिवाळी (Diwali 2022)...घरोघरी दिवाळीची तयारी मोठ्या उत्साहात सुरु आहे. दिवाळीत माता लक्ष्मी आणि गणरायाची आराधना केली जाते. आपल्या घरात (Home) लक्ष्मी सदैव नांदावी म्हणून घरात साफसफाई (Diwali cleaning) केली जाते. कारण म्हणतात की जिथे स्वच्छता असेल तिथे लक्ष्मी नांदते. मग जर तुम्ही घराची साफसफाईशिवाय घराला रंग करायचा विचार करत असाल तर वास्तूशास्त्रानुसार (Vastu Tips) घरातील खोल्यांना रंग द्या. त्यामुळे तुमचं घरात सुख-समृद्धी नांदेल. वास्तूनुसार तुमच्या घराच्या भिंतींना रंग दिल्यास तुमचं कुटुंबाचं नशिब उघले असं वास्तूशास्त्रात म्हटलं जातं. शिवाय घराची रंगरंगोटी (Home Colour) करताना वास्तूची काळजी घेतल्यास तुमच्या घरात सकारात्मक उर्जा निर्माण होते. चला तर मग जाणून घेऊयात कुठल्या खोलीला कुठला रंग द्यायला हवा.
(Diwali 2022 Vastu Tips for Home Colour nmp)
लिव्हिंग रूम (Living room) आणि डायनिंग रूमसाठी (dining room) 'हा' रंग द्या
लिव्हिंग रूमला निळा, पांढरा, गुलाबी किंवा हलका हिरवा रंग (Colour) केल्यास वास्तूनुसार हे शुभ मानलं जातं. याशिवाय तुम्ही लिव्हिंग रूमला तपकिरी, हिरवा, पिवळा आणि बेज रंगही देऊ शकता. तर डायनिंग रूममध्ये तुम्ही हलके रंग करू शकता. तर वास्तूनुसार जेवणाच्या खोलीत हलका हिरवा, निळा किंवा गुलाबी रंग असणे शुभ राहील.तर स्वयंपाकघरात पांढरा रंग करून घ्यावा ज्यामुळे तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल.
बेडरूमला (Bedroom) कुठला रंग द्यायचा?
वास्तुशास्त्रानुसार, बेडरूममध्येही हलक्या रंगांचा वापर करावा. तुम्ही हिरवा, निळा किंवा गुलाबी रंग वापरू शकता. तर लहान मुलांच्या खोलीत हिरव्या,निळ्या किंवा काळ्या रंग द्यायला हवा.
हेही वाचा - Diwali 2022: वास्तुशास्त्रानुसार अशी करा दिवाळीची साफसफाई, नाहीतर लक्ष्मी होईल नाराज
अभ्यास आणि देवघराची खोली (Study and Devghara room)
काही घरांमध्ये मुलासाठी अभ्यासाठी वेगळी खोली असते. अशावेळी या स्टडी रुमला लाल, गुलाबी, निळा, हिरवा किंवा हलका तपकिरी रंग द्या त्यामुळे खोलीत सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. तर देवघराच्या खोलीला लाल, हिरवा, काळा किंवा गुलाबी रंग द्यायला हवा. वास्तूशास्त्रानुसार हे रंग तुमच्यासाठी शुभ फळ देतील. तर बाथरूममध्ये राखाडी, पांढरा आणि गुलाबी रंग द्यायला पाहिजे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)