Narak Chaturdashi : अवघ्या काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. त्यामुळे आता सर्वजण दिवाळीच्या तयारीत मग्न आहेत. दिवाळी हा हिंदू धर्मातील (Hindu) सर्वात महत्त्वाचा सण (Festival) मानला जातो. दिवाळी उत्सवाला प्रकाशोत्सव असंही म्हणतात. येत्या 12 नोव्हेंबरला दिवाळी साजरी होणार आहे. मात्र, मोठ्या दिवाळीपूर्वी छोटी दिवाळी (Chhoti Diwali) आणि धनत्रयोदशी हे सणही मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात. छोटी दिवाळी म्हणजे काय? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. काहींनी हे नाव आधी ऐकलं देखील नसेल. छोटी दिवाळी का साजरी केली जाते? त्यामागील कारण काय? भगवान श्रीकृष्णाच्या 16 हजार बायकांचा काय संबंध? पाहुया...


नरकासुराची कहाणी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदू पौराणिक कथांनुसार नरकासुर नावाचा राक्षस एका राज्यात राहत होता. या राक्षसाने भगवान इंद्राचाही पराभव केला होता. त्यामुळे त्याची ताकद चांगलीच होती. नरकासुराने देवी, देवता आणि ऋषींच्या मुलींचे अपहरण केलं होतं. आपल्या शक्तीचा गैरवापर करून त्याने 16 हजार मुलींना आपल्या ताकदीखाली ठेवलं होतं. कोणताही देव नरकासुराचा वध करू शकला नाही, असं त्याला वरदान मिळालं होतं. त्याचा मृत्यू केवळ स्त्रीच्या हातून होऊ शकत होता. त्यामुळे भगवान श्रीकृष्णाच्या रथावर बसलेल्या नरकासुराचा वध करायला सत्यभामा गेली. 


सत्यभामा आणि नरकासुर यांच्यातील युद्धात सत्यभामाने नरकासुराचा वध केला आणि 16 हजार मुलींना सत्यभामाने मुक्त केलं. मात्र, मुक्तता झाल्यानंतर देखील  बंदिवासात राहिलेल्या मुलींवर समाजाकडून प्रश्नचिन्ह लगावले जात होते. त्यावेळी र्व स्त्रियांना समाजात आदर आणि मान्यता मिळावी म्हणून भगवान श्रीकृष्णाने सर्व स्त्रियांना आपली पत्नी मानलं. नरकासुराच्या आईने आपल्या मुलाचा मृत्यू शोक दिन म्हणून न करता सण म्हणून साजरा केला जावा म्हणून छोटी दिवाळी साजरी केली होती, अशी कथा सांगितली जाते.


दक्षिण दिशेला दिवा का लावतात?


छोटी दिवाळीला यम दिवाळी किंवा नरक चतुर्दशी असंही म्हणतात. या दिवशी लोक आपल्या घराबाहेर दक्षिण दिशेला भगवान यमाच्या नावाने दिवा लावतात. असं केल्याने घरात सुख आणि समृद्धी येते, असं म्हणलं जातं.


दरम्यान, दिवाळीचा सण साधारणपणे 5 दिवस म्हणजे धनत्रयोदशी, चतुर्दशी, दिवाळी, गोवर्धन पूजा आणि भाऊबीज हे सण साजरे केले जातात. मात्र, यंदा 6 दिवस दिवाळीचा सण साजरा केला जाईल.  गोवर्धन पूजा न करता सोमवती अमावस्या साजरी केली जाईल. 


(Disclaimer:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)