मुंबई : रात्री झोपताना अनेकदा खुप लोकांना पुस्तक, मोबाईल, पाण्याची बॉटल घेऊन झोपायची सवय असते. मात्र ही सवय त्यांचं मोठ नुकसान करू शकते. कारण खाली दिलेल्या या पाच गोष्टी झोपताना  डोक्याजवळ ठेवल्याने जीवनात नकारात्मकता आणि अशुभतेचं प्रभाव वाढते. यामुळे घरात गरिबी तर येतेच पण व्यावसायिक जीवन आणि संपत्तीवरही वाईट परिणाम होतो. त्यामुळे वास्तूमध्ये झोपताना कोणत्या गोष्टी डोक्यापासून दूर ठेवण्याचा सल्ला दिला आहे ते जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वॉलेट 
वास्तूनुसार आपण कधीही पर्स किंवा पाकीट बाजूला ठेवून झोपू नये. हे करणार्‍यांच्या हातात पैसाही थांबत नाही. त्यांचा खर्च विनाकारण वाढतो. या गोष्टी कपाटात किंवा सुरक्षित ठेवून झोपल्या तर बरे होईल.


साखळी किंवा दोरी
रात्री झोपताना डोक्याजवळ कधीही दोरी किंवा साखळी ठेवू नये. असे करणाऱ्यांच्या आयुष्यात अडथळे कधीच कमी होत नाही. करियरमध्ये ते वारंवार अपयशी ठरतात. अशा लोकांना साधी कामेही मोठ्या कष्टाने पूर्ण करावी लागतात. .


वर्तमानपत्र, मासिक किंवा पुस्तक
जर तुम्हीही रोज रात्री उशीखाली पुस्तक, वर्तमानपत्र किंवा मासिक घेऊन झोपत असाल तर ही चूक लवकरात लवकर सुधारा. अशा गोष्टी डोक्याखाली ठेवल्याने जीवनात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो. असे लोक आयुष्यात कधीच प्रगती करू शकत नाहीत.


पाण्याची बाटली
अनेक लोक पाण्याची बाटली शेजारी ठेवून झोपतात. पण तुम्हाला माहित आहे का की याचा आपल्या आयुष्यावर खूप वाईट परिणाम होतो. असे करणाऱ्यांची एकाग्रता नेहमीच बिघडते. मानसिक ताण माणसाला घेरतो.


आधुनिक उपकरणे 
रात्री झोपताना घड्याळ, फोन किंवा लॅपटॉप ही उपकरणेही डोक्याजवळ ठेवू नयेत. वास्तुशास्त्र सांगते की झोपताना डोक्याजवळ अशा कोणतीही गोष्ट असू नये ज्यामुळे नकारात्मकता वाढते. यामुळे केवळ पैशाची हानी होत नाही तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर त्याचा वाईट परिणाम होतो