रविवारी चूकुनही करू नका ही कामं, होतील भयंकर परिणाम
सनातन हिंदू धर्मात रविवार हा सूर्यदेवाचा दिवस असल्याचे म्हटले जाते. अशात रविवारी कोणती कामं करू नये ते जाणून घ्या... जेणे करून तुम्हाला कराव्या लागणार नाहीत अडचणींचा सामना...
मुंबई : सनातन हिंदू धर्मात रविवार हा सूर्यदेवाचा दिवस असल्याचे म्हटले जाते. हिंदू धर्मात सूर्य हा पिता, आत्मा आणि आदराचा कारक मानला जातो. याशिवाय भगवान दिनकर म्हणजेच सूर्याला नऊ ग्रहांचा राजा म्हटले जाते.सूर्य अतिशय तेजस्वी, यशस्वी आणि प्रखर आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ज्या व्यक्तीवर सूर्याची कृपा असते, ती व्यक्ती समाजात विशेष स्थान मिळवते. त्यांचा मान, दर्जा, संपत्ती इत्यादींमध्ये कधीही घट होत नाही.
अशा परिस्थितीत रविवारी भगवान सूर्याची पूजा केल्यानं बरेच फायदे होतात. भगवान सूर्याला नियमित अर्घ्य अर्पण करावे, परंतु वेळेअभावी किंवा इतर कारणांमुळे असं करणं शक्य नसेल तर रविवारी नक्कीच करा.
'ऊँ ऐही सूर्यदेव सहस्त्रांशो तेजो राशि जगत्पते।
अनुकम्पय मां भक्त्या गृहणार्ध्य दिवाकर:।।
ऊँ सूर्याय नमः, ऊँ आदित्याय नमः, ऊँ नमो भास्कराय नम:।'
अर्घ्य समर्पयामि।।
अशी मान्यता आहे की सूर्याचा तुमच्या जीवनावर नेहमीच शुभ आणि सकारात्मक प्रभाव पडतो. त्या व्यक्तीचं जीवन प्रकाश आणि उर्जेने भरतं. त्यामुळे सूर्याचा आशीर्वाद मिळावा म्हणून त्यांची नित्य पूजा करावी. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने रविवार हा सूर्याचा दिवस मानला जातो. म्हणून, या दिवशी शुद्ध मनानं आणि भक्तीनं भगवान सूर्याची विशेष पूजा केल्यानं जीवन सर्वत्र प्रकाशानं भरते आणि सूर्य ग्रहाला शांत करण्याचा हा सर्वात विशेष मार्ग मानला जातो. ज्योतिषांच्या मते, यामुळे तुम्हाला जीवनातील सर्व आव्हानांचा सामना करण्यास आणि यशाच्या शिखरावर पोहोचण्यास मदत होते. या दिवशी सूर्याची पूजा करण्यासोबतच काही खास गोष्टींची विशेष काळजी घ्यावी.
रविवारी, विशेषत: या 7 गोष्टी मुळीच करू नयेत. असं केल्यानं सूर्याची कृपा तुमच्यावर कमी होऊ शकते असं म्हटलं जातं. चला तर मग जाणून घेऊया कोणती आहेत ही सात कामे
रविवारी काय करू नये?
1. रविवारी चुकूनही तुळशीच्या झाडाला अर्घ्य अर्पण करू नका. असं म्हटलं जातं की यामुळे तुमच्या घरात दारिद्र्य येते आणि अनेक प्रकारचे संकट तुमच्या कुटुंबावर येतात. शास्त्रात या दिवशी तुळशीच्या रोपाला स्पर्श करणेही निषिद्ध मानले गेले आहे.
2. रविवारी तांबं, पितळ, चांदी, सोनं या धातूपासून बनवलेल्या वस्तू, भांडी इत्यादींचा व्यवहार करू नका. असं म्हटलं जातं की यामुळे तुमची आर्थिक स्थिती कमकुवत होईल, तसेच तुमच्या कुंडलीत उपस्थित असलेला सूर्यही कमजोर होतो.
3. रविवारी मीठाचे सेवन करू नये. असे मानले जाते की यामुळे तुमच्या जीवनात अनेक प्रकारचे शारीरिक आणि मानसिक त्रास उद्भवतात आणि कुटुंबातील एखाद्याला आरोग्याशी संबंधित मोठ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
4. रविवारी मोहरीच्या तेलानं मसाज करू नका. मोहरी ही सूर्याची प्रकृती मानली जाते. मसाज करून शारीरिक त्रासापासून सुटका मिळण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यामुळे भगवान सूर्य कोपतात असे म्हटले जाते.
5, मसूर डाळ, लाल हिरव्या भाज्या, आलं, उडदाची डाळ किंवा इतर पदार्थ खाऊ नयेत. असं म्हटलं जाते की यामुळे तुमच्या राशीत असलेला सूर्य कमजोर होऊ शकतो.
6. रविवारी निळे, काळे, गडद तपकिरी रंगाचे कपडे परिधान करू नयेत. तसेच या दिवशी चामड्याचे शूज वापरू नयेत.
7. रविवारी मांस, मद्य, मासे इत्यादींचे सेवन करू नये, दारू पिऊ नये. असे म्हटले जाते की असं करणं तुमच्यासाठी घातक ठरू शकतं. यामुळे तुमच्या ग्रहांच्या संक्रमणावर दीर्घकालीन दुष्परिणान देखील होऊ शकतो.
हेही वाचा : Malaika Aroraसोबत अरबाजच्या गर्लफ्रेंडचं आहे असं नात? जॉर्जिया एंड्रियानीनं स्वत: केला खुलासा
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)