Tulsi Plant Significance : हिंदू संस्कृतीमध्ये (Hindu Tulsi) तुळशीला अनन्यसाधारण महत्त्वं आहे. ज्या घरामध्ये तुळशीचं रोप आहे, तिथे सदैव सुखसंपत्ती आणि भरभराट नांदते असं म्हटलं जातं. तुम्हाला माहितीये का? हे रोप असणं जितकं महत्त्वाचं त्याहूनही त्याची काळजी घेतली जाणं महत्त्वाचं आहे. आपण, सहसा घरामध्ये खिडकीच्या भागात झाडं ठेवतो. तिथं तुळशीसोबत (Tulsi Plant) इतरही काही झाडं आपण ठेवतो. पण, या पवित्र रोपाशेजारी कोणतंही झाड किंवा रोप ठेवून चालत नाही. (Do not keep Giant calotrope rui plant near Tulsi know the facts)


कोणतं रोप तुळशीशेजारी ठेवू नये? (Don`t put these plants next to tulsi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असं म्हणतात की तुळशीच्या शेजारी कधीच रुई लावू नये. यामुळं नकारात्मक परिणाम दिसून येतात. अनेकजण सहसा एका कुंडीतच दोन रोपंही लावतात. तर, असंही अजिबातच करु नये. कारण, सहसा काही रोपांमधून एक पांढरा द्रव्य बाहेर पडतो. हा द्रव्य जर तुळशीच्या रोपावर चुकूनही पडला तर मोठं नुकसान होतं. बरं या नुकसानातून सावरताना बराच वेळही दवडला जातो. 


तुळशीच्या शेजारी कधीच निवडुंगही ठेवू नका. निवडुंगाला असणाऱ्या काट्यांमुळे घरामध्ये नकारात्मक उर्जेचा वावर वाढतो. या रोपाला राहू-केतूचं प्रतीक मानलं जातं. ज्यामुळं ते कायमच दक्षिण पश्चिमेला ठेवावं. तर, तुळशीसाठी योग्य दिशा म्हणजे पूर्व किंवा पूर्वोत्तर. त्यामुळं कधीही ही दोन रोपं एकाच दिशेला ठेवू नये. तुळस आणि निवडुंग एकत्र ठेवल्यास तुळशीची सकारात्मकता हळुहळू संपुष्टात येते. 


तुळशीचे दोन प्रकार, कसा ओळखाल फरक? (Types of tulsi)


घरांमध्ये सहसा दोन प्रकारची तुळस पाहायला मिळते. एक म्हणजे राम तुळस आणि दुसरी म्हणजे कृष्ण तुळस. आता या तुळशींमध्ये त्यांच्या नावांप्रमाणेच इतरही काही फरक आहेत. राम तुळस हिरव्या रंगाची असते. तिच्या पानांची चव काहीशी गोड असते. पुराणांमध्ये उल्लेख केल्यानुसार मर्यादापुरुषोत्तम श्रीरामाला ही तुळस वाहिली जाते. राम तुळस घरात लावल्यामुळे शांतता आणि समृद्धि नांदते. (Ram Tulsi )


कृष्ण तुळशीबाबत सांगावं तर, या तुळशीला आयुर्वेदातही महत्त्वं आहे. बऱ्याच औषधांमध्ये कृष्ण तुळस वापरली जाते. साधारण गडद जांभळ्या आणि काळपट रंगांची पानं असणारी ही तुळस श्रीकृष्णाला प्रिय असल्याचं सांगण्यात येतं. (Krishna Tulsi)


(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांवर आधारित आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)