`या` गोष्टी चुकूनही गाडीच्या डिक्कीत ठेवू नये! शनिदेवाच्या प्रकोपाचा करावा लागेल सामना
ज्योतिषशास्त्रानुसार लोखंडी वस्तूंचा थेट संबंध हा शनिदेवाशी जोडला गेला आहे. त्यामुळे लोखंडी वस्तू आणि कारची खरेदी करताना शास्त्रानुसार काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचे आहे.
ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्रांचा मानवी जीवनासह पृथ्वीतलावर परिणाम होतो. या ग्रह आणि नक्षत्रांचा स्थितीचा घरातील प्रत्येक गोष्टीशी असतो. त्यामुळे या ग्रहांना शांत ठेवू आयुष्यात सकारात्मक ऊर्जेसाठी ज्योतिषशास्त्रात उपाय सांगण्यात आले आहेत. ग्रहांच्या स्थितीने आपल्या आयुष्यात नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेचा वावर असतो. ज्योतिषशास्त्रात राहू आणि शनिदेव हे क्रूर आणि संकटाचे ग्रह मानले जातात. तर शनिदेवाचा संबंध हा लोखंड आणि लोखंडी वस्तूशी जोडला गेला आहे. त्यामुळे जेव्हा आपण घरात लोखंडी वस्तू, अगदी चार चाकी किंवा दुचाकी विकत घेतो. तेव्हा काही गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा शनिदेवाचा प्रकोपाचा तुम्हाला समाना करावा लागू शकतो. त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार कारच्या डिक्कीत काही गोष्टी चुकूनही ठेवू नका, नाहीतर शनिदेव नाराज होईल. (Do not keep these things in the trunk of the car by mistake Have to face the wrath of Saturn or shani dev)
'या' गोष्टी चुकूनही गाडीच्या डिक्कीत ठेवू नये!
कार, बाईक किंवा स्कूटर असो, काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. कारच्या डिक्कीमध्ये आपण बरेच सामान ठेवतो आणि कधीकधी त्यात काही अनावश्यक सामान देखील पडलेलं असतं. ज्योतिष शास्त्रानुसार कारच्या डिक्कीत ठेवलेल्या अनावश्यक वस्तू तुमच्यासाठी हानिकारक ठरण्याची शक्यता आहे. कारण यामुळे शनिदेव नाराज होतात आणि कुंडलीवर नकारात्मक प्रभाव पडतो, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलंय.
ज्योतिषशास्त्रानुसार स्टेपॅन आणि टूल किट यासारख्या आवश्यक गोष्टी कारमध्ये नेहमी असाव्यात. मात्र निरुपयोगी आणि जुनी बिले, कागदपत्रे, खराब झालेल्या बाटल्या इत्यादी डिक्कीमध्ये ठेवणे योग्य मानले जात नाही. यामुळे, एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर नकारात्मक प्रभाव पडतो ज्यामुळे अनेक प्रकरणांमध्ये तुमचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे गाडीची डिक्की ही नेहमी स्वच्छ असावी हे लक्षात ठेवा.
कार खराब होणे, शनीचा प्रभाव ?
ज्योतिष शास्त्रानुसार, जर तुमची गाडी पुन्हा-पुन्हा खराब होत असेल तर ते शनिदोषामुळे देखील असण्याची मोठी शक्यता आहे. कारण शनि दोषामुळे गाडी बिघडते किंवा अपघात होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे वाहनाची वेळोवेळी स्वच्छता आणि सर्व्हिसिंग करणे गरजेचे आहे. जेणेकरून तुमच्या कुंडलीवर शनि दोषाचा प्रभाव नाहीसा होईल.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)