पायात काळा धागा का बांधतात? याचे फायदे जाणून घेतल्यावर तुम्हीही तो नक्की बांधाल
कोणी हा धागा फॅशनम्हणून घालतो. परंतु या काळ्या धाग्याचे धर्म आणि ज्योतिषाच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे.
मुंबई : आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी काळा धागा घातला असेल. काही लोक हा धागा पायात घालतात, तर काही गळ्यात, तसेच काही लोक याला कमरेत देखील बांधतात. हा धागा बांधण्या मागचं प्रत्येकाचं वेगवेगळं कारण आहे. कोणी हा धागा फॅशनम्हणून घालतो. परंतु या काळ्या धाग्याचे धर्म आणि ज्योतिषाच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की, काळा धागा घालने हा एक उपाय आहे, ज्यामुळे जीवन आनंदी आणि समृद्ध होते तसेच अनेक संकटांपासून देखील हा धागा बचाव करतो.
आता हा धागा का घातला जातो आणि याचे फायदे काय आहेत हे जाणून घेऊया.
नकारात्मक शक्ती दूर राहते
ज्योतिषशास्त्रानुसार काळा धागा घातल्याने नकारात्मक शक्ती दूर राहते. एवढेच नाही तर ती व्यक्ती अनेक प्रकारच्या संकटांपासून वाचते. याशिवाय काळा धागा घालण्याचे अनेक फायदे आहेत.
- काळा धागा नजर दोषांपासून संरक्षण करतो. ज्या मुलींना किंवा लहान मुलांना वारंवार नजर लागते, त्यांनी काळा धागा जरूर घालावा.
- कुंडलीत शनि ग्रह अशुभ स्थितीत असेल, तर पायात काळा धागा धारण केल्याने खूप फायदा होतो. यामुळे आरोग्य आणि आर्थिक स्थितीवर शनीचा नकारात्मक प्रभाव टाळता येईल. अन्यथा शनीची वाईट नजर खूप नुकसान करते.
- ज्या लोकांना आर्थिक नुकसान होत आहे किंवा व्यवसायात नुकसान होत आहे. अशा लोकांनी पायात काळा धागा घातल्याने याचा फायदा लगेच दिसेल.
- जर कुंडलीत राहू-केतू कमजोर असतील, तर पायात काळा धागा जरूर घालावा. हे तुम्हाला अनेक प्रकारच्या संकटांपासून वाचवते. राहू आणि केतू हे छाया ग्रह आहेत, त्यांचे अशुभ राहिल्याने जीवन उध्वस्त होऊ शकते.
असा घाला काळा धागा
- शनिवारी काळा धागा घाला.
- काळा धागा नेहमी भैरव मंदिरात नेल्यानंतरच धारण करावा. तसेच पायात काळा धागा धारण केल्यानंतर शनिदेवाच्या बीज मंत्राचा किमान २१ वेळा जप करावा.
- काळ्या धागा घातल्यानंतर किंवा त्यासोबत लाल किंवा पिवळा धागा कधीही घालू नका.
- काळा धागा धारण केल्यानंतर गायत्री मंत्राचा दररोज 11 वेळा जप करण्याचा प्रयत्न करा. यामुळे अनेक पटींनी फायदा होईल.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.)